नागपूर दि,८ एप्रिल २०२५ –महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर राज्यातील तापमान ४४ अंशावर पोहोचलं आहे. तापमानाचा वाढता पारा पाहता न्यायालयाने शाळांना तडकाफडकी आदेश दिले आहेत. वाढलेले तापमान पाहता विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यां दिले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रक ठरवावे अशी माहिती दिली आहे.
संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने या वर्षी निर्णय घेतला होता. त्यामुळे आजवर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत विदर्भातील शाळांच्या परीक्षा संपत असताना, यावर्षी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार आहेत.
मात्र विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेला तापमान पाहता शिक्षण विभागाच्या संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विदर्भातील शाळांनी तीव्र विरोध दर्शविला होता. शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले होते. सोबतच उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याची काही दाखल करण्यात आली होती… काल संध्याकाळी उशिरा या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन विदर्भातील शाळांसाठी परीक्षेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करावे असे निर्देश दिले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने न्यायालयाच्या निर्देशांचा स्वागत करत विदर्भातील शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित निर्णय करून विदर्भातील शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी अशी मागणी केली आहे.. विदर्भातील तीव्र ऊन आणि वाढलेले तापमान लक्षात घेता १५ एप्रिल च्या पूर्वी विदर्भातील शाळांच्या परीक्षा घेण्यात याव्या अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे..
पहिली ते नववीच्या परीक्षांना आज, ८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. राज्यभरातून १ कोटी ४५ लाख विद्यार्थी या परीक्षांना बसतील. २५ एप्रिल रोजी या परीक्षा संपतील. यंदा प्रथमच नववीला नियतकालिक मूल्यमापन चाचणी (पॅट) पद्धती लागू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने या परीक्षांचे वेळापत्रक प्रथमच राज्यस्तरावरून जारी केले. याला शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी विरोध करत स्वतंत्र वेळापत्रक देखील शासनाला प्रशासनाने सर्व तयारी व्यवस्थित केली आहे. परीक्षा वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.२५ एप्रिल रोजी परीक्षा संपणार आहेत.