‘होमेथॉन २०२३’ च्या माध्यमातून घराचे स्वप्न साकारण्याची संधी

नाशिकच नव्हे तर मुंबई, पुणे, विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचाही असेल सहभाग

0

जगाच्या पाठीवर विकसित झालेल्या शहराकरिता दळवणवळण हा अत्यंत महत्वाचा विषय असतो. शहराची कनेक्टिव्हीटी जितकी उत्तम तितकी त्याची सर्वांगिण प्रगती वेगाने होत असते. आज जगाच्या पाठीवर नाशिक हे १६ व्या क्रमांकाचे वेगाने विकसित होणारे शहर मानले जाते. मुबई, पुण्यानंतर नाशिकनेही विकासाची गती धरली आहे. धार्मिकनगरी, सांस्कृतिकनगरी, वाईन कॅपिटल, एज्युकेशन हब, विपुल निसर्ग सौंदर्य, वर्षभर अल्हाददायक वातावरण, मुबलक पाणी यामुळे गुंतवणूकीसाठी उत्तम शहर म्हणून नाशिकची निवड केली जात आहे. अशा या नाशिक नगरीत स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २१ ते २५ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदान गंगापूर रोड येथे ‘होमेथॉन २०२३’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे प्रदर्शन नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन ठरणार असल्याचा विचार नरेडकोच्या संचालकांनी व्यक्त केला. या माध्यमातून गुंतवणूकीची सुवर्णसंधी नरेडकोने नाशिककरांना उपलब्ध करून दिली आहे.

नरेडको विषयी
नरेडको नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ची स्थापना १९९८ मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली. आज नरेडको ही देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची उद्योग संघटना आहे. गृहनिर्माण उद्योगात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता आणणे आणि रिअल इस्टेटमध्ये गुुंतलेल्या सर्व लोकांना त्यांच्या संधी आणि आव्हानांबददल बोलण्यासाठी एक स्थान प्रदान करणे ही या गटामागील कल्पना होती. क्षेत्रात उदभवणार्‍या कोणत्याही समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ते एकत्र काम करू शकतात. नरेडको हा एक प्रकारे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील दुवा आहे. नरेडकोच्या भारतभरात शाखा आहेत.

नाशिसोबतच मुंबई, पुणे, विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग- मुख्य समन्वयक जयेश ठक्कर
‘होमेथॉन २०२३’ च्या माध्यमातून नाशिककरांना नाशिक विभागातील गंगापूर रोड, कॉलेजरोड, महात्मानगर, सातपूर, आडगाव, हिरावाडी, गोविंदनगर, काठेगल्ली, नाशिकरोड, पंचवटी, वडाळा, पाथर्डी फाटा, त्र्यंबकरोड, म्हसरूळ आदी भागात गृह खरेदीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदाच्या एक्स्पोचे खास वैशिष्टयै म्हणजे मुंबई येथील रूणवाल बिल्डर्सचा देखील स्टॉल या प्रदर्शनात असणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील प्रापर्टीचे पर्यायही उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे अकोला, यवतमाळ, नागपूरचेही बांधकाम व्यावसायिकांचेही गृहप्रकल्पांचे स्टॉल्स येथे असतील. गतवर्षीच्या होमेथॉनच्या माध्यमातून ३४२ सदनिकांची विक्री करण्यात आली होती. यंदा पाच दिवसीय प्रदर्शनात स्पॉट बुकिंग करणार्‍या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असून पॉवर्ड बाय रुंगठ ग्रुप चे ललित रुंगठ ,सह प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एलआयसी हौसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हौसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शनात घर घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांना विविध बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे होमेथॉन एक्स्पोचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.

विमानसेवा, मेट्रो, एक्सप्रेस वे मुळे विकासात भर -अध्यक्ष अभय तातेड
हवाई, रेल्वे, रस्तेमार्गे दळणवळण यंत्रणांचा विकास झाल्याने नाशिकपासून इतर शहरे जणूकाही हाकेच्या अंतरावर आली आहेत. चौपदीकरणामुळे मुंबई नाशिक अंतर अवघ्या दोन ते अडीच तासात कापता येतो. नाशिक पुण्याचे पाच ते सहा तासांचे रस्तामार्गे अंतर अवघ्या तीन ते चार तासांवर आले आहे. सेमी हायस्पीड ट्रेनमुळे नाशिक पुणे रेल्वेमुळे नाशिक पुणे अंतर दोन तासांवर येणार आहे. नाशिकमधून जाणार्‍या समृध्दी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर अंतर ८ तासांवर आले आहे. सुरत-चैन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे या विकासाला अजून गती मिळणार आहे. या महामार्गामुळे नाशिक दाक्षिणात्य राज्यांशी जोडले जाणार आहे. या महामार्गाच्या बाजूला लॉजिस्टिक हब आणि स्मार्ट शहर वसविण्यात येणार असल्याने रिअल इस्टेटलाही सुगीचे दिवस येऊ घातले आहेत. याचमुळे शहरात फ्लॅट, पलॉट, बंगलो, रो हाऊसेसला मागणी वाढली आहे. येत्या काही वर्षांत त्यातून चांगला परतावाही मिळू शकेल. नाशिक शहरातही महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित आय.टी. पार्क, निओ मेट्रो प्रकल्प आणि व्दारका ते नाशिकरोड डबलडेकर उडडाणपूल प्रकल्पामुळे नाशिकच्या चौफेर विकासाला गती देणार आहेत. त्यामुळे नरेडकोच्या होमेथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून गुंतवणूकीची नामी संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी सांगितले.

दर्जेदार जीवनशैलीचा अनुभव – सचिव सुनिल गवादे
सातत्याने नाविन्याचा अंगीकार आणि दर्जेदार गृहनिर्मितीच्या माध्यमातून नाशिककरांसमोर जीवनाचा एक नवा दृष्टीकोन समोर ठेवण्याचे उदिदष्ट ठेवून नरेडको नाशिककरांना गृहप्रकल्पाचे पर्याय उपलब्ध करून देत असते. वाहतुकीसाठी सुलभता, उत्तम हवामान, मुबलक पाणी, शहरापासून काही अंतरावर पर्यटनासाठी उपयुक्त ठिकाणे, मुंबई, पुण्यासारख्या शहरांच्या तुलनेत कमी महागाई विशेष म्हणजे आनंदी आणि आरोग्यदायी जीवनशैली या वैशिष्टयांमुळे नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. कोरोनानंतर जीवनामानात बरासचा बदल अनुभवायला मिळत आहे. ‘क्वॉलिटी ऑफ लाईफ’ ला लोक अधिक महत्व देऊ लागले आहेत. पर्यावरणस्नेही आणि हरित शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. इथले वातावरण निसर्गसौंदर्य सर्वांना आकर्षिक करते. नाशिकचा विचार केला तर पूर्वी ‘वन’ आणि ‘टू’ बीएचके फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत होती मात्र आता जर बघितले तर ‘थ्री’, ‘फोर’ बीएचके पासून ते वन फ्लोअर वन फ्लॅट अगदी ४ ते ७ हजार स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना पसंती मिळू लागली आहे. ग्राहकांचा कल लक्षात घेता नाशिकमध्ये १५ लाखांपासून ते ५ कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या घरांनाही मागणीही आहे. पायाभुत सुविधांबरोबर विविध प्रकारचे मोठे प्रकल्प येथे उभे राहत आहेत. कृषी विकास, औद्योगिक विकास मोठया प्रमाणात होतो आहे. झपाटयाने विकसित होणार्‍या या शहरात गुंतवणूकीची सुवर्णसंधी नरेडकोने उपलब्ध करून दिल्याचे नरेडकोचे सचिव सुनिल गवादे यांनी सांगितले.
अभय ओझरकर
9890377274

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.