होमेथॉन २०२३ मधून होणार गृह स्वप्नूपर्ती
मोठया उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे वाढला रिअल इस्टेट गुंतवणुकीचा कल
महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईनंतर झपाटयाने विकसित होणार्या शहरांमध्ये नाशिक हे प्रमुख केंद्र मानले जाते. एचएएल, करन्सी नोट प्रेस, इंडिया सिक्युरिटी प्रेस, देवळाली तोफखाना ही केंद्र सरकारची महत्वाची केंद्रे, नाशिकमध्ये आहेत. याबरोबरच सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, विंचुर येथील औद्योगिक क्षेत्रात मोठया उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे.तसेचराजुर बहुला येथे प्रस्तावित आयटी पार्क असा शहराचा सर्वांगिण विकास पाहता हे शहर लोकांना राहण्यासाठी भुरळ घालतयं. नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेडकोच्यावतीने २१ ते २५ डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदान येथे ‘होमेथॉन २०२३’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककरांना शहर तसेच उपनगरातील गृह प्रकल्पांचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन नरेडकोच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वात मोठे गृह प्रदर्शन ठरणार
रूद्राक्ष ते द्राक्ष आता वाईन इंडस्ट्री ते देशाचे कृषी तसेच शैक्षणिक हब, मेडीकल हब म्हणून नाशिक नावारूपाला येउ लागले आहे. आरोग्य आणि मुक्त ही दोन विद्यापीठे शहरात आहेत. शिवाय जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था असो किंवा वैद्यकिय सेवांचे जाळे संपूर्ण जिल्हयात विस्तारले गेले आहे. वाढत्या विकासातही पर्यावरणाला बाधा उत्पन्न होणार नाही यादिशेने शहराचा विकास होत आहे. नाशिकला असलेले हे महत्व लक्षात घेऊन अनेक बडया विकासकांनी आपल्या गृह प्रकल्पांसाठी नाशिकची निवड केली आहे. सर्वकाही एकाच ठिकाणी या धर्तीवर नवीन गृहप्रकल्प संकुल स्वरूपात उभे राहत आहेत. नरेडकोने नाशिककरांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन विविध गृह प्रकल्पांचे पर्याय ‘होमेथॉन २०२३’ मध्ये सादर केले आहे. इतकच नव्हे तर यंदा मुंबई, पुण्यासह विदर्भातील विविध नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग या प्रदर्शनात राहणार आहे. या माध्यमातून ग्राहकांचा थेट बिल्डर्ससोबत संपर्क होऊन प्रकल्पांची निवड करणे सोयीचे होणार आहे.
शंतनू देशपांडे,सह समन्वयक,नरेडको
मोठया उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे वाढला रिअल इस्टेट गुंतवणुकीचा कल
पायाभूत सुविधांची रेलचेल असलेल्या नाशिकला समृध्दी एक्सप्रेस हायवे लाभलेला आहे.सुरत-चैन्नई एक्सप्रेस वे, नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होऊ घातला आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन, नाशिक निओ मेट्रोचा देखील प्रकल्प प्रस्तावित आहे. अलीकडेच इमिग्रेशन काउंटर नाशिकला मान्यता मिळाली असल्याने आंतरराष्ट्रीय विमाने इथे थांबतील. नाशिकमधून येणारा वर्ग आता महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून येणार आहे. त्यामुळे शहरातील गुंतवणुक वाढणार असून बाहेरून नाशिकमध्ये वास्तव्यास येणार्यांचे प्रमाणही वाढणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून होमेथॉन २०२३ च्या माध्यमातून ग्राहकांच्या आपल्या घराच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा या प्रदर्शनाचा उददेश आहे. प्रदर्शनात एकूण पाच डोम असून यात दोन प्रिमियम डोम असतील. तसेच प्रदर्शनाला भेट देणार्या नागरिकांना प्रवेश विनामुल्य असला तरी,रजिस्ट्रेशन सक्तीचे असेल. स्पॉट बुकिंगवर काही बांधकाम व्यावसायिकांकडून विशेष ऑफर्सही देण्यात येणार आहे. तसेच दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येणार असून भाग्यवंतांना विविध बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
भूषण महाजन, सह समन्वयक, नरेडको
नरेडको डिजीटल प्लॅटफॉर्मव्दारे राज्यभरात
प्रदर्शनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी नरेडकोच्या माध्यमातून आयोजीत या प्रदर्शनातून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद पाहता यंदाच्या वर्षी बांधकाम व्यावसायिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आग्रही आहेत. ‘होमेथॉन २०२३’ बाबत मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रदर्शन सोशल मिडीयाव्दारे पोहचले आहे. प्रदर्शनाच्या प्रचार, प्रसारासाठी आणि नाशिकमधील गुंतवणुक वाढीसाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून व्हाटसअप, फेसबुक तसेच रेडिओ, वृत्तपत्र, डिजीटल मिडीयाव्दारे या प्रदर्शनाची प्रसिध्दी केली जात आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये होर्ल्डिंगही लावण्यात येऊन प्रदर्शनाची जाहिरात करण्यात आली आहे. नरेडको केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर शहराच्या विकासाच्यादृष्टीने सतत विविध उपक्रम राबवत असते तसेच नरेडकोतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ‘नरेडको नेक्स्ट जेन’ च्या माध्यमातून प्रदर्शनाच्या कालावधीत रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.
भाविक ठक्कर, उपाध्यक्ष नेक्स्ट जेन नरेडको,महाराष्ट्र