नरेडको होमेथॉन प्रदर्शनातून नाशिकच्या विकासासह आपल्या घराचे स्वप्न साकार होणार:दीपक चंदे

नरेडको आयोजित " होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२" प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबर २०२२ पासून नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रदर्शाचे मुख्य प्रायोजक  दीपक बिल्डर्स चे सर्वेसर्वा दीपक चंदे यांच्याशी केलेली खास बातचीत

0

 

नरेडको आयोजित ” होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२” प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबर २०२२ पासून नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रदर्शाचे मुख्य प्रायोजक  दीपक बिल्डर्स चे सर्वेसर्वा दीपक चंदे यांच्याशी केलेली खास बातचीत

दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स हे नरेडको नाशिक प्रॉपर्टी एक्झिबिशन होमेथॉन एक्स्पो २०२२ चे प्रायोजक आहेत. दीपक बिल्डर्स हे नाव नाशिककरांना अगदी जवळंच आहे. त्यांच्या नवनव्या कल्पना आणि कल्पकता यांच्या मिलाफातून साकरलेल्या घरांची नाशिककरांनाच नाही तर बाहेरगावच्या इन्व्हेस्टर्सना देखील भुरळ पडते. दीपक बिल्डर्स चे सर्वेसर्वा दीपक चंदे आज केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध नाहीत तर उत्कृष्ट समाजसेवक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कोविड काळात त्यांनी खास कोविड रुग्णांसाठी उभारलेले हॉस्पिटल असेल, भटक्या जनावरांच्या उपचारासाठी सुरू केलेली १०९ नंबरची रुग्णवाहिका असेल दीपक चंदे यांचे समाजाप्रती असलेले योगदान तोलामोलाचे आहे. अवसायनात गेलेला नाशिक सहकारी साखर कारखाना नव्याने चालवायला घेऊन तो यशस्वी करून दाखवणाऱ्या दीपक चंदे हे खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक आहेत. यश हे केवळ एकट्याचे नसते तर सगळ्यांना घेऊन मोठे होण्यात खरे यश असते हे मानणारे चंदे यांनी नाशिकच्या विकासाकरिता भरीव योगदान दिले आहे. अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी नाशिकमध्ये आणले. नाशिकला पासपोर्ट ऑफिस सुरु होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हल्दीराम सारखा ब्रान्ड नाशिकमध्ये आणून इथल्या उद्योगाला चालना दिली आहे. रिलायन्स, ताज सारख्या नामांकित ब्रान्ड सोबत त्यांचा टायअप आहे त्यातूनच विवांता सारखे स्टार हॉटेल नाशिकमध्ये आहेत. मुलांच्या शिक्षणाबद्दल दीपक चंदे यांना विशेष आस्था आहे यातूनच लवकरच ते नाशिकमध्ये इंटरनॅशनल स्कूल आणताय.  शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे २२ ते २५ डिसेंबर २०२२ याकाळात होणाऱ्या नरेडको होम्थोन एक्स्पोचे टायटल स्पोन्सरर आहेत,

सर नरेडकोला प्रायोजकत्व देण्यामागचा उद्देश काय आहे ?
– नरेडको म्हणजे “नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल” हि सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट यांची संस्था आहे. रियल इस्टेट डेव्हलपर्सना बरोबर घेऊन बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी संस्थेमार्फत सरकार पर्यंत पोहोचवाव्यात त्यांचं निराकरण व्हावं अशी तिची मूळ संकल्पना आहे. नरेडकोच्या स्थापनेमागे आणखी एक कारण आहे, गव्हरमेंटच्या बांधकाम क्षेत्रातील ज्या संकल्पना असतात त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी डेव्हलपर्सनी काम करावं. ग्राहकांच्या अडचणी गव्हरमेंटपर्यंत पोहोचवाव्यात हा या मागचा उद्देश आहे. नरेडको हा एक प्रकारे आणि ग्राहक यांच्या मधला दुवा आहे. नरेडको च्या भारतभरात शाखा आहेत. महाराष्ट्रात आहेत, मी देखील नरेडकोचा सदस्य आहे. एकप्रकारे हि माझीच संस्था आहे. संस्थेमार्फत मोठे काम होत आहे जे फक्त नाशिककरांसाठीच नाही तर महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे नरेडकोवर ग्राहकांचा विश्वास आहे, ती त्यांच्यासाठी काम करणारी संस्था आहे समाजउपयोगी काम करण्याची दीपक बिल्डर्सची ख्याती आहे म्हणूनच नरेडकोच्या नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशनला आम्ही प्रायोजकत्व द्यायचं ठरवलं.

नरेडको प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये ग्राहकांसाठी काय वेगळेपण आहे?
– अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे. “लिव्ह – इन्व्हेस्ट – ग्रो” हि नरेडकोची संकल्पना आहे. नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे सगळे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. “बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स देखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचं नाणं या ठिकाणी भेट मिळणार आहे जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे”.प्रॉपर्टी व्यतिरिक्त याठिकाणी बांधकाम मटेरियल, इंटिरियर मटेरियलचे स्टॉल असणार आहे. विविध बँकांच्या स्कीम सवलती सुविधा इथे ग्राहकांना एकाचवेळी समजतील.

चंदे सर यासगळ्या योजना तर छान आहेत ग्राहक त्याचा फायदा घेतील हि आशा आहेच पण नाशिक व्यतिरिक्त इतर ठिकाणचे रहिवासी स्थायिक होण्यासाठी, बिझनेस सुरु करण्यासाठी  नाशिकची निवड करतात तेव्हा त्यांना नाशिकमध्ये वेगळे काय मिळते ?

– कॅपिटल सिटी मुंबईच्या जवळ, सांस्कृतिक पुण्याच्या शेजारी समृद्धी महामार्गाच्या जाळ्यात असलेल्या सुवर्ण चतुष्कोनातील हे महत्वाचं शहर आहे. नाशिकचे हवामान हे कायम निवासाकरिता आरोग्यदायी आहेच सोबत इथे सातत्याने इंडस्ट्रियल वाढ होत असल्याने बाहेरगावच्या नागरिकांचा नाशिकमधे स्थायिक होण्याचा कल वाढलेला आहे.

नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी ? 
– नाशिक वेगाने वाढणारे शहर आहे. इथल्या परिपूर्ण वातावरणाचा परिणाम इथल्या पिकांवर होत असतो, उत्तम प्रतीचे द्राक्ष – ऊस – टोमोटो अशा पिकांमुळे इथले शेतकरीच समृद्ध नाहीत तर अनुषंघाने होणारे व्यवसाय देखील तेजीत असतात त्यामुळे पैशांचे चक्र अव्याहतपणे फिरत रहाते. जोडीने नाशकात HAL  सारखा मिग विमानांचा कारखाना आहे, इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे, रोजगाराच्या संधी कायम तयार होणारे हे शहर आहे. इथे दोन MIDC एरिया आहेत. नाशकात प्रत्यक्ष काम आणि वर्क फ्रॉम होम दोन्ही होऊ शकते. स्टार्टअप सुरु करण्यासाठी नाशिक  अतिशय योग्य ठिकाण आहे. सातत्याने वेगवान वाढ होणाऱ्या भारतातील निवडक शहरांमध्ये नाशिकचा बारावा क्रमांक आहे! आणि शहर नक्कीच वेगाने वाढतच जाणार आहे, २०२७ साली येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून सतराशे कोटी निधी अपेक्षित आहे. पैशांचा परतावा इथे पटापट मिळतो, म्हणून नाशिक गुंतवणुकीकरिता अतिशय योग्य आहे.

नाशिकचे वैशिष्ट एका व्यावसायिकाच्या दृष्टीकोनातून कसं सांगाल ?
– कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमधे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे कायम होत असतं. पायाभूत सुविधांची रेलचेल असलेल्या नाशिकला समृद्धी एक्सप्रेस हायवे लागलेला आहे, सुरत चेन्नई एक्सप्रेस वे, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे होऊ घातली आहे, मुंबई नागपूर बुलेट ट्रेन, नाशिक निओ मेट्रोचे नियोजन देखील सरकारने केलेलं आहे, अलीकडेच इमिग्रेशन काउंटर नाशिकला मान्यता मिळाली असल्याने आंतरराष्ट्रीय विमान इथे थांबतील. महाराष्ट्रातील पर्यावरण स्नेही आणि हरित शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. इथे शहराच्या विकासाच्या वेगाशी स्पर्धा करीत वृक्ष लागवड – संवर्धनासाठी मोठ्याप्रमाणावर काम होत असतं त्यामुळेच इथला प्रत्येक ऋतू हवाहवासा असतो, या देखण्या शहरात रहायचं स्वप्न असणाऱ्या प्रत्येकासाठी सुवर्ण संधी घेऊन आलंय नरेडको नाशिक होमथॉन एक्स्पो २०२२ !

३४ वर्षांपासून आपण बांधकाम व्यवसायात आहात! नरेडको आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनमुळे रियल इस्टेट फिल्डमध्ये काय बदल अपेक्षित आहेत ?
या प्रदर्शनाचा रिअल इस्टेट आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. रियल इस्टेटची वाढ म्हणजे शहराचा विकास. यामुळे महानगरपालिकेला महसूल मिळतो, प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण होतो. सरकार जसे शेतीला प्राधान्य देते तसेच बांधकाम व्यवसायाला द्यायला हवे. माझे सरकारला एक आवाहन आहे, धान्यांचे – उसाचे भाव जसे फिक्स असतात तसेच स्टील आणि सिमेंटचे दर मर्यादित कसे रहातील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. इंटरेस्ट रेट, सिमेंटच्या वाढत्या किंमती यावर कंट्रोल असला पाहिजे. नाशिकचे बांधकाम व्यावसायिक त्यांच्या पातळीवर अनेक प्रयोग करून बघत आहेत. ऐश ब्रिक्स असो वा प्लास्टिक ब्रिक्स आम्ही प्रयोगशील आहोत, नाशिक हरित रहाण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो याची नोंद या प्रदर्शनाच्या निमित्ताने नक्की घेतली जाईल.

अभय ओझरकर
9890377274

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.