Nashik : ‘जिंदाल’मधील भीषण आगीत २ जणांचा मृत्यू १८ जण जखमी 

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर धावले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भेट देणार... (भीषण आगीचा व्हिडीओ पहा)

0

नाशिक,दि.१ जानेवारी २०२३ –  मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर भडकलेली आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात . आगीने रौद्ररुप धारण केले असून विविध आस्थापनांच्या अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करुनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे आता लष्कराची मदत घेतली जात असून लष्कराचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले आहे. असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून १८ जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी ११.३० वाजता जिंदाल कंपनीत स्फोट झाला या अपघाताचे वृत्त कळताच पालकमंत्री दादा भुसे,केंद्रीय मंत्री भारती बागुल,विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी गंगाधरन डी. हेही घटनास्थळी पोहचले असून सिल्लोडमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही जिंदाल कंपनीची पहाणी करण्यासाठी निघाले आहेत.

या दुर्घटनेची भीषणता लक्षात घेऊन महिंद्र आणि महिंद्रा कंपनी, घोटी टोल नाका, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक येथून अग्निशमन दल आणि पंप घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तसेच  इगतपुरीच्या एसएमबीटी मेडिकल कॉलेजमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे. सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत. आग अजूनही आटोक्यात नसल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहे. घटनास्थळी सात रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आगीमुळे झालेली वित्तीय तसेच जीवित हानी बाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

भीषण आगीचा व्हिडीओ पहा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!