Nashik : जिल्ह्यात कोरोनाचे ८२५ रुग्ण  तर २६७२ कोरोना मुक्त : ५ जणांचा मृत्यू 

मागील २४ तासात : शहरात ३९९ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ६८३९ : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ %

0

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही दिवसापासून घटते आहे.प्रशासनाने काही निर्बंध शिथिल जरी केले असले तरी नागरीकांनी कोरोनाच्या नियमांच्या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ८२५ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या ३९९ झाली तर जिल्ह्यात आज २६७२ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आज १६६४ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.

 
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज  ९६.६७ % झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०४ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३९९ तर ग्रामीण भागात ३९९ मालेगाव मनपा विभागात ०८ तर बाह्य १९ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.८० झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६८३९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ४५९१ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  –
नाशिक शहरात ९६.८० %, नाशिक ग्रामीण मधे ९६.४२ %, मालेगाव मध्ये ९६.५२ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.३८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६७%इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-५

नाशिक महानगरपालिका- ०४

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८८३६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०७२

सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १९

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४७२८

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १२

४) मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ११८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१९६२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १६६४

आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण

लक्षणे असलेले रुग्ण  – ११८६

लक्षणे नसलेले रुग्ण – ५६५३


ऑक्सिजन वरील रुग्ण  – १३२

व्हेंटिलेटर वरील रुग्ण  – २१

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

 

https://janasthanonline.com/wp-content/uploads/2022/02/AGE-SEX-TEMPLATE-POSITIVE-04-FEB-22.pdf

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!