Nashik :पावसामुळे इगतपुरी जवळील कावनई किल्ल्याचा काही भाग कोसळला
सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही (व्हिडिओ पहा)
नाशिक ,दि. २० जुलै २०२३ – नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे.आज कावनई किल्ल्याच्या डोंगरावरील एक मोठा भाग बिटूर्ली गावाच्या बाजूने खचला असून याचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे.आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी जनस्थान शी बोलताना केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित बारवकर हे अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत तातडीने घटनास्थळी पोहचले असून प्रशासकीय अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती अधिका-यांनी सांगितले आहे. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ट्रेकर्सने टेकडी,किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे : पालकमंत्री दादा भुसे
या घटनेबाबत नाशिक पालकमंत्री दादा भुसे म्हणाले कावनाई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
विटूर्ली शिवारात दोन घर आहेत. त्यांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी,किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे.नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
(व्हिडिओ पहा)