नाशिक,दि,३० एप्रिल २०२४ –मुंबई आग्रा महामार्गावर ट्र्क आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही घटना चांदवड जवळील राहुड घाटात घडली आहे. सकाळी ९ ते ९:३० दरम्यान हा अपघात घडला आहे.अपघातग्रस्त बस जळगावहून वसई कडे जात होती
या अपघाताची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.राहुड घाटात एसटी बस व ट्रकची जोरदार धडक झाली.जखमींना घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे.अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
बसचे टायर फुटल्याने हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे.सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे नेते नितीन वानखेडे यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.