Nashik :आचार्य बडवे यांच्या श्रीराम कथेचे सोमवार दि ७ ऑगस्ट पासून आयोजन

0

नाशिक,दि. ६ ऑगस्ट २०२३- अधिक महिन्याचे औचित्य साधून आचार्य श्रेयसजी बडवे यांच्या श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ७ ऑगस्ट ते रविवार दिनांक १३ ऑगस्ट या काळात गंगापूर रोडवरील कुर्तकोटी डॉ. शंकराचार्य सभागृहात ही कथा होईल.

शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ एस.एल.देशपांडे यांनी या कथेचे आयोजन केले आहे. कीर्तन जुगलबंदीसाठी प्रसिद्ध असलेले आचार्य श्रेयसजी बडवे आणि सौ मानसी बडवे हे दोघेही या राम कथेमध्ये सहभागी होणार असून त्यांना स्वप्निल परांजपे (संवादिनी) आणि भालचंद्र बाळ (तबला) साथ करणार आहेत.दररोज सायंकाळी साडेचार ते आठ या कालावधीत होणारी श्रीराम कथा दैनंदिन स्वरूपात पुढील प्रमाणे संपन्न होईल.

श्रीराम कथाक्रम …
७ ऑगस्ट – राम कथा भूमिका ..
महर्षी वाल्मिकी चरित्र,
कुश-लव श्रीराम भेट
८ ऑगस्ट – महापराक्रमी रघुवंश,
श्रीराम जन्मोत्सव ..
९ ऑगस्ट – त्राटिका वध,अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर ..
१० ऑगस्ट – अयोध्या आनंद उत्सव,
श्री राम वनवास गमन ..राम लक्ष्मण सीता गंगा पार.. चित्रकूट निवास
११ ऑगस्ट – राम भरत भेट ..सीता अपहरण ,
राम भक्त शबरी ,हनुमंत भेट
१२ऑगस्ट – सीता शोधमोहीम
लंका दहन ..
१३ ऑगस्ट- भूवरी रावण वध झाला राम राज्याभिषेक

असा रामकथेचा रोजचा कार्यक्रम असून नाशिकमधील भाविकांनी कथा श्रवणाचा आनंद घ्यावा; असे आवाहन ॲड. एस. एल. देशपांडे आणि देशपांडे परिवाराकडून करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.