Nashik : मार्च मध्ये होणार “आयामा इंडेक्स २०२२” आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन

१८ मार्च ते २१ मार्च २०२२ दरम्यान डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर होणार प्रदर्शन

0

नाशिक – उद्योजक, व्यावसायिक, ग्राहक यांना नावीन्यपूर्ण माहितीसह नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आयामा दर दोन वर्षांनी औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करीत असते.आयामांचे हे औद्योगिक प्रदर्शन १८ ते २१ मार्च २०२२ दरम्यान नाशिकच्या  गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर होणार असल्याचे आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ व आयामा इंडेक्स २०२२ चे चेअरमन धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ही पत्रकार परिषद आयामा रिक्रिएशन सेंटर येथील के.आर. बुब हाल मध्ये पार पडली.यावेळी व्यासपीठावर आयामांचे अध्यक्ष निखिल पांचाळ, आयामा इंडेक्स चे चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, सचिव योगिता आहेर, गोविन्द झा, खजिनदार  राजेंद्र कोठावदे, माजी अध्यक्ष  राजेंद्र अहिरे होते.आयामा इंडेक्स मधून नवीन उद्योजकांना पुढे जाण्यासाठी चालना मिळणार आहे त्याचप्रमाणे नवीन गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे आयामाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले.

या प्रदर्शनाच्या स्टॉल बुकींगला अगोदरच उद्योजक, ग्राहक व व्यावसायिकांनी भरघोस पाठिम्बा दिला असून यात जवळपास ३०० स्टॉल  बुकींग पूर्ण झाले असल्याची माहिती आयामा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी दिली.  बाकी २३ स्टॉल ही लवकरच बुक होतील गरज पडल्यास स्टॉल ची संख्या वाढवण्यात येईल असे ही ते म्हणाले. नाशिकमध्ये उडान यॊजना, समृद्धी महामार्ग, बीएमएआय चा समावेश, सुरत चेन्नई महामार्ग व महाराष्ट्रातील भोगोलिक परीस्तीथी मुळे नाशिकचा विकास झपाट्याने होणार आहे असेही धनंजय  बेळे यांनी सांगितले. याप्रसंगी स्टार्टअप या योजनेविषयी स्वतंत्र स्टॉल या प्रदर्शनात राहणार असल्याचे सांगितले.

या औद्योगिक प्रदर्शनामध्ये HAL new business, इनिजिनीरिंग, मशीन टूल्स, मंचत्रनिक्स, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिकस व  इंडस्ट्रीयल  कंजुमरस, टेक्स्टाईल्स, आयटी व ऑफीस ऑटोमेशन, नॉन कन्व्हर्शनल एनर्जी, सोलर सिस्टिम, बँकिंग इंशुरंस, फायनान्स एजुकेशन, टुरिजम तसेच फूड प्रॉडक्ट्स करीता  स्वतंत्र अद्ययावत स्टॉल व दालन उभारण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची  २ विभागात विभागणी करण्यात आलेली असून ओपन स्पेसचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले असल्याचे सांगितले. या प्रदर्शनात कुणीही कुठेही स्टॉल बुकींग करू शकणार आहेत.नाशिकमध्ये जवळपास ४ तो ५ वर्षांपासून औद्योगिक प्रदर्शन ना झाल्यामुळे ह्या आयामा इंडेक्स २०२२ ला मोठा प्रतिसाद मिळणार आहे.

यावेळी आयामा इंडेक्स २०२२ चे चेअरमन धनंजय बेळे यांनी सांगितले की या प्रदर्शनामुळे शहरापासून खेड्यापर्यंत हॊणाऱ्या देशाच्या विकासाला व प्रगतीला चांगली चालना मिळण्यास मदत होणार आहे. मानुस  माणसाची ओळख विसरत चाललेला आहे. जीवन इतके गतिमान झाले आहे की की औद्योगिक क्षेत्रात आपल्या शेजारचा उद्योजक काय उत्पादन  करतॊ आपल्याला माहिती नसतो. अंबड सातपूर मधील बरेचसें उद्योजक निर्यात मोट्या प्रमाणात करतात व मोट्या कम्पन्याना उत्पादने निर्यात करतात विविध क्षेत्रातील अनेक प्रकारची देशी व विदेशी उत्पादने बनवतात या अशा अनेक उत्पादनांची माहिती जागतिक पातळीवर, देश पातळीवर, गाव पातळीवर व्हावी त्याच्या मालाला बाजारपेठ मिळावी त्यांचा विकास व्हावा व विस्तार वाढावा, रोजगार वाढावा, नाशिकचा विकास झपाट्याने व्हावा, व सर्व उद्योगांनी एकत्रित येऊन नाशिकचे चांगले ब्रॅंडिंग व्हावे तसेच नाशिक शहरात जास्तीत जास्त गौंतवणूक यावी यासाठी आयामाइंडेक्स २०२२ चा फायदा होणार आहे. आयामांचे हे औदयोगिक प्रदर्शन सर्व सुविधांयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जा-चे असणार आहे. स्टॉलधारकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत असेही धनंजय बेळे यांनी सांगितले.

मुंबई आणि पुण्याच्या सुवर्णत्रिकोणात नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे मुबलक हवा पाणी आणि जमिनीमुळे सर्व क्षेत्रातील विकासासाठी गुंतवणुकीला  पोषक वातावरण उपलब्ध आहे त्यामुळे आयामांच्या या औद्योगिक प्रदर्शनात उद्योजक व्यापारी व्यावसायिक ग्राहक यांना सर्व व्यवसायांबाबत अद्ययावत व नवीन तंत्रज्ञानासह नावीन्यपूर्ण माहिती व फायदा मिळणार आहे. आयामा दर दोन वर्षांनी औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करीत असल्याने उद्योग व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन करोडो रुपयाची उलाढाल होणार आहे.

या औद्योगिक प्रदर्शनात नाशिक, मुंबई, पुणे,, सोलापूर, नागपूर, गुजरात, वापी, सुरत, आमदाबाद, राजकोट, व इतर शहरातून स्टॉल बुकींगला  मोठा प्रतिसाद मिळाला आहे  या संधीचा व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उद्योजक व्यावसायिकांना फायदा घेण्यासाटी स्टॉल  बुक करून उद्योग व्यवसायात वाढ करावी व जागतिक तंत्रज्ञानाच्य स्पर्धेत मागे राहू नये यासाठी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी राधाकृष्ण नाईकवाडे, दिलीप वाघ, हर्षद बेले, मृदुला जाधव, राहुल गांगुर्डे, देवेंद्र राणे, जयंत पगार, विराज गडकरी, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, एन टी गाजरे, वैभव चावक, विरळ ठक्कर, विजय जोशी, योगेश मोरे आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.