‘चित्ररत्न’ प्रदर्शनाचे दिमाखदार उदघाटन: नाशिककरांसाठी कला-हस्तकलेचा नजराणा

२१ आणि २२ जून रोजी हे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी खुले

0

नाशिक, दि. २१ जून २०२५ – Nashik Art Exhibition नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी दालनात क्रिएटीव्ह बड्स आणि प्रसिद्ध गायिका दसककर भगिनी यांच्या पुढाकारातून आयोजित ‘चित्ररत्न’ चित्र व हस्तकला प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन आज पार पडले.

उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अभय ओझरकर,छायाचित्रकार प्रसाद पवार, आणि मूर्तिकार श्रेयस गर्गे यांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांमध्ये दसककर भगिनी, पं. माधव दसककर, राजा पाटेकर आणि पुरुषोत्तम भार्गवे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी दसककर कदडी आणि अश्विनी दसककर भार्गवे यांनी केले. कलाकार प्रसाद पवार, श्रेयस गर्गे, रत्ना भार्गवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

गेल्या १५ ते २० वर्षांपासून दर मे महिन्यात आयोजित होणाऱ्या शिबिरांमधून शिकलेल्या या नव्या कलाकारांनी मंडला आर्ट, मधूबनी, वार्ली, झेंटॅंगल, वॉटरकलर, क्रेयॉन, ग्रीटिंग्ज, हस्तकला अशा विविध माध्यमातून आपली कला सादर केली आहे. रत्ना भार्गवे यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या या कलाकारांनी नोकरी व कुटुंब सांभाळून आपली कला जोपासण्याचा आदर्श ठेवला आहे.

Nashik Art Exhibition,‘Chitraratna’ inaugurated with grandeur: A gift of arts and crafts for Nashik residents

सहभागी कलाकारांची नावे:( Nashik Art Exhibition)
मल्हार भार्गवे, सुरश्री दसककर, श्रावणी प्रसाद, गौरी दसककर अपस्तंब, ईश्वरी दसककर कदडी, रुचिरा भार्गवे, कल्याणी दसककर तत्ववादी, गोरी भार्गवे धर्माधिकारी, अश्विनी दसककर भार्गवे

🎨 प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:(Creative Buds,Dasakakar Sisters)
या प्रदर्शनामध्ये विविध चित्रशैली आणि हस्तकला प्रकार पाहायला मिळणार असून, यात मुख्यतः खालील प्रकार समाविष्ट आहेत:
मंडाला आर्ट
मधुबनी व वारली चित्रशैली
वॉटरकलर लँडस्केप
झेंटॅंगल व टायपोग्राफी
क्रेयॉन व पेन्सिल स्केच
ग्रेसफुल पेपर कट वर्क
हस्तकलेची खास नमुनेदार निर्मिती

👩‍🎨 गुरू रत्ना भार्गवे यांचा प्रभाव:
हे प्रदर्शन केवळ कला सादर करण्यापुरते मर्यादित नसून, यामागे चित्रकार रत्ना भार्गवे यांचे दीर्घकालीन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आहे. मे महिन्यातील शिबिरांमधून शिकलेले हे कलाकार आता विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असले तरी, त्यांनी आपल्या कलेची जपणूक करत या १५-२० वर्षांच्या परंपरेला उत्स्फूर्तपणे जपले आहे.

👩‍🎨 प्रदर्शनात सहभागी कलाकार:

शनिवार व रविवार, २१ आणि २२ जून रोजी हे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी खुले असून, आयोजकांनी सर्व नाशिककरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!