Nashik : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अशिमा मित्तल

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची बदली

0

नाशिक,३० सप्टेंबर २०२२ – शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. यात नशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या जागेवर आयएएस अशीमा मित्तल यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. अशीमा मित्तल या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या.

आज शुक्रवारी दुपारी अशिमा मित्तल नाशिक जिल्हा परिषदेत दाखल झाल्या असून त्यांनी बनसोड यांच्याकडून सीईओ (CEO) पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.त्याचच बरोबर सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची बदली जालन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!