Nashik : श्री काळाराम मंदिरात १ जानेवारीला अष्टौप्रहर स्वरहोत्र
आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन : पहाटे सहा ते उत्तररात्रीपर्यंत संगीत क्षेत्राकडून होणार विविध रागांची स्वरसाधना...
नाशिक दि.२८ डिसेंबर २०२२ –काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने १ जानेवारीला पहाटे साडेपाचपासून या स्वरहोत्राला प्रारंभ होणार आहे.भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेनुसार संपूर्ण दिवसाच्या २४ तासातील ८ प्रहरात विविध थाटावर आधारित रागांची स्वरसाधना करण्यासाठी अष्टौप्रहर स्वरहोत्र या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन, वादन आणि कृथ्थक नृत्यक्षेत्रातील नामवंत कलाकार आपआपली कला सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे यांची असून संयोजन श्री काळाराम संस्थानचे विश्वस्त अॅड. दत्तप्रसाद (अजय) निकम करणार आहेत. तर निमंत्रक श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर व शुभम मंत्री तसेच समन्वयक म्हणून सी.एल.कुलकर्णी, एन.सी देशपांडे,समीर देशपांडे,मित्र जीवाचे फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश भोरे मोलाचे काम करत आहेत.
पंचवटीतील प्राचीन श्री काळाराम मंदिर मंदिरात रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५.३० वाजेपासून ते मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम होणार असून भारतीय कालगणनेत संपूर्ण दिवसाचे म्हणजेच २४ तासांचे एकूण ८ प्रहर असून या आठही प्रहरात विविध रागांची स्वरसाधना करण्यात येते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेनुसार या अष्टौप्रहर स्वरहोत्र विविध थाटांवर आधारित रागांची स्वरसाधना या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाला मैत्र जीवाचे फाऊंडेशनचे अविनाश बोडके, महेश महंकाळे, सुनिल बोरसे, सचिन कोळपकर व अन्य विश्वस्त यांचे सहकार्य लाभले असूनअष्टौप्रहर स्वरहोत्र कार्यक्रमात नाशिक मधील दिग्गज गायक, कलाकार, सृजन, रसिक आणि भक्त यांची मांदियाळी असणार आहे. या सृजनांचं प्रयोजन, संकल्पन,आरेखन, नियोजन आणि निवेदन , सोबतीला काळाराम संस्थान यांचं आयोजन आणि नाशिक मधील समस्त कलाकारांचे समर्पण या त्रिवेणी संगमातून नाशिक शहरात एक नवीन कला संस्कृती रुजू होत आहे.
प्रभू श्रीरामच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी, पौराणिक आणि ऐतिहासिक महात्म्य लाभलेली काळाराम मंदिराची पवित्र वास्तूत, रविवार, पौष शुद्ध दशमी शके १९४४ दि. १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५:३० वाजताच्या काकड आरतीने मंगलमय वातावरणात सुरु होणारी अभिजात संगीताचे सूर त्यानंतर दिवसभर घुमणार असून रात्री उशिरापर्यंत ही मैफिल उत्तरोत्तर रंगत जाणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत ‘गायन, वादन, नृत्य, आणि चित्रकला’ या अभिजात कलांचे ‘सेवा-समर्पण’. दिवसाच्या आठ प्रहराशी निगडीत विविध ‘थाट, राग, घराणी, पद्धती, वैशिष्ठ्य आणि गायकी’ सोबतीला विविध वाद्ये, वादन कौशल्य, नृत्य आणि विविध कलांचा संगम अनुभवयास मिळणार आहे.एकीकडे ‘स्वर-होत्र’ सुरु होतांना, उदबत्यांचा घमघमाट, विविधरंगी रांगोळ्यांनी सजलेली वास्तू, प्रहराशी रंगसंगती साधत पैठणी-नऊवारी ल्यालेल्या महिला ‘श्रीराम चरणी’ पुष्पांजली वाहून प्रसन्न पहाटे वातावरणाची निर्मिती करणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरानुसार या अष्टौप्रहर स्वरहोत्र विविध थाटांवर आधारित रागांची स्वरसाधना
प्रथम प्रहरात वेळ पहाटे ५ ते ६
काकड आरती, त्यानंतर ६ ते ८.३० वाजेपर्यंत त्यानंतर सचिन चंद्रात्रे यांचे ध्रुपद गायन होणार असून त्यांना दिगंबर सोनवणे (पखवाज ) असून रुद्राक्ष साक्रीकर (सारंगी ) हे साथसंगत करणार आहेत. तर असावरी खांडेकर राम नाम आणि राम रक्षा सादर करणार आहेत, सहगायक स्नेह चिमलगी, उदय कुलकर्णी, चिन्मय भार्गवे, सुर गोखले, श्रावणी गीते आहे. तर तंत्रनिर्मिती सहाय्य तृप्ती तिजोरे करणार आहेत. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यागंणा डॉ. सुमुखी अथणी द्रुपद गायनावर आधारित कथक पुष्पांजली सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन स्वानंद बेदरकर करणार आहेत.
द्वितीय प्रहरात सकाळी ८.३० ते ११
या दरम्यान गायन सतारवादन आणि कार्यक्रम होणार आहे. यात अस्मिता सेवेकरी गायन सादर करणार असून साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ) रसिक कुलकर्णी (तबला ) यांच्या आहे. त्यानंतर उद्धव अष्टुरकर सतार वादन करणार असून त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ) यांचे आहे. तसेच देवश्री नवघरे गायन करणार असून त्यांना साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ) रसिक कुलकर्णी (तबला ) यांची लाभणार आहे. निवेदन पियु आरोळे-शिरवाडकर करणार आहेत.
तृत्तीय प्रहरात सकाळी ११ ते १.३०
या दरम्यान गायन, वादन, संवादिनी व व्हायोलिन वादन होणार आहे. यात केतन इनामदार गायन सादर करणार असून साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ) अथर्व वारे (तबला ) हे करणार आहेत. त्यानंतर अनिल देठणकर व्हायोलिन वादन करणार असून त्यांना अथर्व वारे तबल्याची साथसंगत करणार आहेत. तसेच राजश्री वैरागकर यांचे गायन होणार असून त्यांना साथसंगत जयदेव वैरागकर (तबला ),संस्कार जानोरकर (संवादिनी ) हे करणार आहेत. त्यानंतर जयदेव वैरागकर संवादिनी वादन करणार असून साथसंगत रसिक कुलकर्णी (तबला ) हे करणार आहेत. निवेदन स्मिता मालपुरे यांचे आहे.
चौथ्या प्रहरी दुपारी १.३० ते ४ वाजता
शास्त्रीय गायनात विविध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यात ज्ञानेश्वर कासार गायन करणार असून साथसंगत संस्कार जानोरकर (संवादिनी ),आदित्य कुलकर्णी (तबला ) करणार आहेत. तसेच अमृता खटी गायन करणार असून साथसंगत जगदीश सोनवणे (तबला ), अनुराधा जोशी (संवादिनी ), हे करणार आहेत. त्यानंतर क्षितिजा शेवतेकर आणि लितीश जेठावा अनुक्रमे सतार व बासरी वादन करणार असून त्यांना साथसंगत दिगंबर सोनवणे (तबला ) यांची आहे. तसेच मधुरा बेळे यांचे गायन होणार असून साथसंगात संस्कार जानवरकर (संवादीनी ) व आदित्य कुलकर्णी (तबला ) यांची आहे. निवेदन सुनेत्रा महाजन यांच्या आहे .
पाचवा प्रहर सायंकाळी ४ ते ६.३०
या दरम्यान आहे, याच गायन, भरतनाट्यम नृत्य अविष्कार, बासरी वादन असे कार्यक्रम होणार आहेत.यात प्रितम नाकील (गायन ) सादर करणार असून साथसंगत दिव्या रानडे (संवादीनी ),दिगंबर सोनवणे (तबला ), शिल्पा नाकील ( भरतनाट्यम नृत्याविष्कार ) सादर करणार असून मोहिनी उपासनी हे बासरी वादन करणार आहेत, त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ),ईश्वरी दसककर (की-बोर्ड ) करणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. आशिष रानडे गायन सादर करणार असून दिव्या रानडे ( संवादीनी ), सौरभ क्षीरसागर (तबला ) यांची साथसंगत लाभणार आहे. निवेदन स्नेहा रत्नपारखी करणार आहेत.
सहावा प्रहर सायंकाळी ६.३० ते रात्री ९
या प्रहरात गायन, वादन आदि कार्यक्रम होणार आहेत. यात गायन शंतनु गुणे सादर करणार असून त्यांना नितीन वारे (तबला ) तर संस्कार जानवरकर (संवादिनी ) साथसंगत करणार आहेत. तसेच पंडित सुभाष दसककर संवादिनी वादन, सुरश्री दसककर संवादिनी सहवादन तर ईश्वरी दसककर कीबोर्ड सहवादन करणार आहेत. त्यांना साथसंगत नितीन पवार, सुजित काळे (तबला ) हे करणार आहेत. त्याचप्रमाणे सोनाली भुसारे मोजाड यांचे गायन होणार असून त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ), ईश्वरी दसककर ( संवादीनी ) करणार आहेत. त्याचप्रमाणे पंडित प्रसाद खापर्डे (गायन ),करणार असून साथसंगत गौरव तांबे व सुजित काळे ( तबला ) तर संस्कार जानोरकर (संवादिनी ) करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन वंदना अत्रे करणार आहेत.
सातवा प्रहर रात्री ९ ते ११.३०
या सीनेगीत, सुगमगीत, भावगीत, नाट्य व रागाधिष्टीत गीतांच्या सादरीकरणाद्वारे रागमाला सादरीकरण होणार आहे. त्यात सादरकर्ते विवेक केळकर, श्रेयसी राव, मिलिंद धटिंगण, प्रांजली बिरारी, मीना निकम, सदानंद जोशी यांचा सहभाग असणार आहे. त्यांना साथसंगत सुवर्णा क्षीरसागर (संवादिनी ), राजू भालेराव (तबला ), जितेंद्र सोनवणे ( की- बोर्ड ) यांची लाभणार आहे. त्यानंतर समृद्ध कुटे यांचे बासरी वादन होणार असून त्यांना साथसंगत अद्वय पवार ( तबला ) करणार आहेत .तसेच कल्याणी दसककर – तत्त्ववादी यांचे गायन होणार असून त्यांना साथसंगत सारंग तत्त्ववादी (तबला ), ईश्वरी दसककर (संवादिनी ) हे करणार आहेत. आर्या गायकवाड व डॉ.अविराज तायडे यांचे (गायन ) होणार असून साथसंगत संस्कार जानोरकर (संवादीनी ), नितीन वारे (तबला ) करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन सदानंद जोशी करणार आहेत.
आठव्या प्रहरी रात्री ११.३० ते रात्री उशिरापर्यंत
गायन, वादन आदि कार्यक्रम होणार आहेत. या श्रीराम तत्त्ववादी गायन करणार असून साथसंगत सारंग तत्ववादी (तबला ), ईश्वरी दसककर (संवादिनी ) करणार आहेत, त्यानंतर प्रतीक पंडित सतार वादन करणार असून साथसंगत अद्वय पवार (तबला ), करतील, तसेच पंडित शंकरराव वैरागकर गायन करणार असून साथसंगत सागर कुलकर्णी (संवादिनी ), ओंकार वैरागकर (तबला ) व्यंकटेश धवन (पखवाज ), ईश्वरी व सरिता वैरागकर (तानपुरा ) साथसंगत करणार आहेत. तर निवेदन धनेश जोशी करणार आहेत.
या कार्यक्रमाचे समन्वयक सी. एल. कुलकर्णी, समीर देशपांडे, गणेश गोरे आहेत तर या कार्यक्रमासाठी विविध संस्था संघटनांचे सहकार्य लाभले आहे. तसेच यात प्रामुख्याने टकले बंधू सराफ सपान आदित्य गोल्ड अन ज्वेलर्स मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल पितांबरी रामबंधू विश्वास ग्रुप,रेडिओ विश्वासाच्या रुचिता ठाकूर आदींचे विशेष सहकार्य लागणार आहे.
एका अपूर्व विचार, संकल्पना, स्वराविष्कार आणि संधी याचे साक्षीदार होणे, हे आम्हा नाशिककरांचे परम कर्तव्य होय. सर्वांची सुयोग्य साथ लाभल्यास एक नवीन संकल्पना रुजवण्याचा, सर्वांना एकाच मंचावर, एकाच विचारधारेवर रुजवण्याचा हा संकल्प आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनात गल्या १५ दिवसांपासून नाशिक शहरातील सुमारे १२५ कलाकार, सुमारे १०० स्वयंसेवक, तसेच सुमारे ३०० महिला आणि संगीत शिकणारे विद्यार्थी व्यस्त आहेत. नाशिक शहरातील सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला असून तयारीत गुंतले आहेत. सोबतच अनेक दानशूर व्यक्तींनी यात आपापल्या परीने या कलाकारांच्या मदतीसाठी विविध सेवा पुरवण्याची जबाबदारी पेलली. अशा अभूतपूर्व. एकत्रित आणि आश्वासक सेवाकार्याचे साक्षीदार होण्याची संधी नाशिककरांना लाभणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमास सर्व नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.