Nashik : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांवर हल्ला

गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करा ; युवक राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी (व्हिडीओ पहा )

0

नाशिक,दि.१६ मे २०२३ – नाशिकच्या नवनिर्माण सेवाभावी संस्थेकडून गौतमी पाटीलच्या विशेष लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. नाशिकच्या ठक्कर डोम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

नृत्य कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नाशिक शहरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

नाशिकच्या नवनिर्माण सेवाभावी संस्थेकडून गौतमी पाटीलच्या विशेष लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. नाशिकच्या ठक्कर डोम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमादरम्यान टवाळखोरांनी मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चे नाशिकचे कॅमरामन आकाश येवले तसेच दिव्यमराठीचे छायाचित्रकार अशोक गवळी यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर आता नाशिक पोलीस हुल्लडबाजांवर काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यभरात गौतमीचे कार्यक्रम जिथे आयोजित करण्यात येतात तिथे अशाच प्रकारची हुल्लडबाजी बघायला मिळते. नाशिकमध्ये हुल्लडबाजांनी तर पत्रकारांवर हल्ला केलाय. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलीस या सातत्याने होणाऱ्या घटनांवर काही मधला मार्ग काढतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

(व्हिडीओ पहा )

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.