Nashik:भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
महायुतीची डोकेदुखी वाढणार
नाशिक,दि,२ मे २०२४ –नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तब्बल एक महिन्यानंतर उमेदवारी जाहीर केली असली तरी महायुतीत अद्याप काही अलबेल नसल्याचे चित्र आहे .छगन भुजबळांचे कट्टर समर्थक समता परिषदेचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित दादा गट) प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे उद्या दि.३ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.
हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली जरी असली तरी स्वामी शांतिगिरी महाराज यांचे ही मोठे आवाहन त्यांच्या समोर आहे.त्यात समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी संघटनेचा चेहरा असलेले दिलीप खैरे निवडणूक रिंगणात उत्तरल्याने हेमंत गोडसें समोर मोठे आवाहन निर्माण होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.छगन भुजबळांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे ओबीसी समाज नाराज असल्याचा सूर आहे.त्यात दिलीप खैरे यांनी निवडणूक रिंगणात उतरल्याने ओबेसी समाज दिलीप खैरे यांच्या पाठशी उभा राहिल्यास महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रचारात आघाडी घेतली आहे.मात्र दिलीप खैरे आणि स्वामी शांतिगिरी महाराज हे निवडणूक रिंगणात उतरल्या नंतर मात्र गोडसेची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उद्या नाशिक लोक सभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.समता परिषदेचे नेते दिलीप खैरे सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते असून महायुती आता काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.