गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार:आ.प्रा.देवयानी फरांदे

‘मोदी की गारंटी’आता गावागावात

0

नाशिक,दि,७ फेब्रुवारी २०२४ –भारतीय जनता पार्टीतर्फे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे.  या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती आ.प्रा.देवयानी फरांदे यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, ॲड.शाम बडोदे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

या गाव चलो अभियानामध्ये जिल्हयातील केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी आदी प्रमुख नेते त्यात्या जिल्ह्याच्या नेमून दिलेल्या गावांमध्ये मुक्कामी राहणार असल्याची माहिती  देण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात य़ेणार आहेत.

शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. या अंतर्गत राज्यात ५० हजार युनिट्समध्ये भाजपाचे 50 हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल, अशी माहिती आ.प्रा.देवयानी फरांदे यांनी दिली.

प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल, असेही आ.देवयानी फरांदे यांनी सांगितले . यावेळी प्रशंत जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दि.१० फेब्रुवारी रोजी नियोजित दौऱ्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.