Nashik : बिपीन बाफना हत्या प्रकरणी दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा 

0

नाशिक,१६ डिसेंबर २०२२ – नाशिक शहरातील बिपीन बाफना या महाविद्यालयीन विद्यार्थी बिपिन बाफना खून प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झाली असून चेतन यशवंत पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा,केवडीबन, पंचवटी)   या दोघांना दोषी ठरवले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बिपीन बाफनाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना जून २०१३ मध्ये घडली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती.अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत अन्य तिघांविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. आता न्यायालयाने दोघा दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अजय मिसार यांनी काम बघितले

नाशिकमध्ये साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. ८ जून २०१३ रोजी मयत बिपीन गुलाबचंद बाफना हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून घरातून गेला होता. त्यानंतर बिपीनचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण करत मोबाईलवरून फोन करून त्याच्या वडिलांकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यानंतर पोलिसात  गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या दोषींनी बिपीन बाफना याची निर्घृणपणे हत्या केली.

दरम्यान २०१३ साली झालेल्या बिपीन बाफना खून प्रकरणाचा उलगडा संशयितांच्या कॉल डिटेल्स वरून झाला. तपासादरम्यान पोलिसांना एका मोबाईल क्रमांकावर संशय आल्याने तपासचक्र गतिमान करत मोबाईल सिमकार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याच्यापर्यंत पोलीस पोहचले. त्याची विचारपूस केली असता त्याने सिम त्याच्या नावावर आहे, मात्र वापर पंजाबच्या जालंधरस्थित त्याची मेव्हणी करत असल्याचे सांगितले. परंतु जेव्हा ती नाशिकला येते तेव्हाच ती मोबाईल वापरते. तोपर्यत हा सिम त्याचा चुलतभाऊ संशयित अमन प्रकटसिंग जट वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित अमनला ताब्यातघेतल्यानंतर तो पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली होती.

तांत्रिक पुराव्याचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते, साडेनऊ वर्षानंतर या खून खटल्याचा निकाल लागला असून ३५ साक्षीदार तपासण्यात आलेत, यातील प्रमुख दोन आरोपींना दोषी ठरविण्यात आलेत तर उर्वरित तिघांची  निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे,अपहरण, खंडणी आणि खून असा तिहेरी गुन्हा घडल्यानं हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!