१६ डिसेंबरला संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद 

0

नाशिक,दि,१४ डिसेंबर २०२३ – नाशिक शहरात येत्या शनिवारी १६ डिसेंबरला संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. तसेच  दि. १७ डिसेंबरला  सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती नाशिक महानगर पालिकेचे अधीक्षक अभियंता यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे

मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेणेत आलेला असुन सदर पंपिंगद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ. वॉटरचा पुरवठा करण्यात येतो . पाणीपुरवठा नाशिक पश्चिम वितरण विभागास प्रभाग क्र.१२ मधील नविन जलधारा वसाहत येथील २० लक्ष लिटर जलकुंभास बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्राचे आवारातुन जोडणी करणे, विसेमळा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड १२०० मि मी पीएससी ग्रॅव्हीटी मेन रॉ वॉटर पाईपलाईन वरील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे एमबीआर लाईनवर फ्लो मीटर बसविणे व पाणीपुरवठा वितरण विभागातील विविध ठीकाणचे दुरुस्तीकामे  कामे करायची आहेत.

तसेच मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये २२० केव्ही सीटी टेस्ट करणे, VIDAR टेस्ट (Test of all vaccume breakers), सर्व इनसुलेशन क्लिनिंग व इतर अनुषंगिक काम कामे करण्यासाठी  शनिवार दिनांक दि. १६ डिसेंबर  सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत  पॉवर सप्लाय बंद ठेवणेबाबत मागणी केली आहे.त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने संपूर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही असे हि पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

म्हणून शनिवार दि. १६/१२/२०२३ रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. तसेच रविवार दि. १७/१२/२०२३ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी अशी माहिती नाशिक महानगर पालिकेकडून  देण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.