शनिवारी दिवसभर संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

0

नाशिक,दि.१५ सप्टेंबर २०२३ – नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाशिक मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील सबस्टेशन मधील दुरुस्तीचे काम व ३३ केव्ही क्षमतेच्या उपकरणांची तपासणी करणे तसेच गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथील मीटरींग क्युबिकलचे नवीन आवश्यक दुरुस्ती उद्या शनिवार दि. १६ सप्टेंबर ला सुरु करण्यात येणार आहे.

ही कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने महावितरण कंपनीकडील वीज पुरवठा उद्या शनिवार दि. १६/०९/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा.बंद ठेवावा लागणार असल्याने उद्या दि. १६/०९/२०२३ रोजी संपूर्ण नाशिक शहरातील पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवार  दि. १७/०९/२०२३ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होईल अशी माहिती नाशिक महानगर पालिकेतर्फे देण्यात आली आहे. यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे हि आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.