नाशिक,दि, १६ मार्च २०२४ –नाशिक महानगर पालिकेने वाजत गाजत सुरु केलेली सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. दोन महिन्याचे वेतन न मिळाल्याने सिटीलिंक चे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणारे प्रशासन सुस्त झाले आहे तर लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे.मात्र सर्वसामान्य मात्र गैरसोयी मुळे हैराण झाला आहे. गेल्या दीड वर्षातील वाहकांनी पुकारलेला आजचा हा ८ आठवा संप आहे.
मागील महिन्यांचे वेतन न मिळाल्याने नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचा-यांनी गुरुवार पासून पुन्हा एकदा काम बंद आंदाेलन छेडले आहे.यामुळे सिटी लिंकची बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.
बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थी,नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहे.अनेकांना खासगी वाहनांचा आधार घेत इच्छित स्थळी जावे लागत आहे.परिणामी नाशिककरांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.