नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत ‘खेळाडू पॅनेल’चा दबदबा!

धनपाल शहा सातव्यांदा चेअरमनपदी विजयी |सर्व अकरा उमेदवारांचा विजय

1

नाशिक | ३ मे २०२५ – Nashik Cricket Association Election  नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत (२०२५-२०२७) ‘खेळाडू पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत संघटनेवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. विद्यमान अध्यक्ष धनपाल (विनोद) मोतीलाल शहा यांनी तब्बल सातव्यांदा चेअरमनपद मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली.

नाशिकमधील अन्नपूर्णा सभागृह, नंदनवन लॉन्स येथे पार पडलेल्या निवडणुकीत १३७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७६ क्लब आणि ३११२ सभासद सहभागी होते.

विजयी उमेदवार व मते:
धनपाल (विनोद) शहा – 1243 मते (चेअरमन)
महेन्द्र (राजू) आहेर – 1222
राघवेंद्र जोशी – 1211
हेतल पटेल – 1169
जगन्नाथ पिंपळे – 1103
शिवाजी उगले – 1064
अनिरुद्ध भांडारकर – 1233
निखिल टिपरी – 1197
विक्रांत मते – 1255
बाळासाहेब मंडलिक – 1205
नितीन धात्रक – 1224

पराभूत उमेदवार:
महेश झुंजार आव्हाड (चेअरमन) – 68
संदीप सेनभक्त – 562
महेश भामरे – 198
ज्ञानेन्द्र सिसोदिया – 152

बिनविरोध निवड:

सेक्रेटरी: समीर रकटे
खजिनदार: हेमंत देशपांडे
संयुक्त सचिव: योगेश (मुन्ना) हिरे, चंद्रशेखर दंदणे
निवड समिती सदस्य: सतीश गायकवाड, तरुण गुप्ता, फैय्याज गंजीफ्रॉकवाला

निवडणूक प्रक्रिया: (Nashik Cricket Association Election )

निवडणूक प्रक्रिया ॲड. मनीष लोणारी आणि असोसिएट्स यांच्या देखरेखीखाली पार पडली. मतमोजणीनंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. उद्या (४ मे) वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड अधिकृतपणे घोषित होणार आहे.

खेळाडू पॅनेल’चे अभिनंदन

या दणदणीत विजयामुळे धनपाल शहा यांच्या नेतृत्वाखालील ‘खेळाडू पॅनेल’चे अभिनंदन सर्व स्तरांतून होत आहे. नाशिक क्रिकेटच्या पुढील वाटचालीसाठी हा निकाल निर्णायक ठरेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] कोणत्या सामन्यापासून सुरु होणार? BCCI कडून समोर आलेल्या माहितीनुसार, […]

Don`t copy text!