Nashik : २८ कोटींची फसवणूक, विजय राठींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

फसवणूक प्रकरणी विजय जगन्नाथ राठी यांना ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी 

0

नाशिक, दि, ४ एप्रिल २०२४ – जागा डेव्हलपमेंट करार करण्याकरिता २८ कोटी रुपये घेत जागा विकसित न करता परस्पर दुसऱ्या व्यावसायिकासोबत करार करून फसवणूक केल्याप्रकरणी राठी आमराई जागामालक विजय जगन्नाथ राठी  यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल ( दि,३ एप्रिल) रात्री उशिरा विजय राठी यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे .

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि विजय कचरदास बेदमुथा (रा. पंडित कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार तीन भागीदारांची स्पेस सिनर्जी कंपनी आहे. विजय राठी यांच्यासोबत बालपणापासूनच ओळख आहे. २००८ मध्ये राठी यांनी कुटुंबियांची एकत्रित मिळकत राठी आमराई जागा विकसित करावयाची आहे असे ची सांगितले. राठी यांच्यासह ९ जणांसोबत जागेचा विकसन करारनामा करत २०१५ २०१२ मध्ये डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट दस्तही नोंदवले.१८ कोटी रक्कम दिली.तसेच राठी व कुटुंबियांना १ कोटी ४१ लाख ५५ हजार रक्कम मेन्टनेससाठी दिली.यासह प्लॅन मंजुर,अॅग्रीमेंट,कर्ज मंजुरीसाठी ८ कोटी ६२ लाख असे २८ कोटी १० लाख १२ हजार रक्कम २००८ ते २०१७ पर्यंत दिली.

सदर मिळकत त्रयस्तला विक्री करता येणार नाही असे न्यायालयाचे आदेश असतांनाही संशयित विजय जगन्नाथ राठी यांनी नाशिकच्या एका मोठ्या  बांधकाम व्यावसायीकासोबत डेव्हलपमेंट करारनामा करत घेत फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आज न्यायालयाने विजय राठी यांना ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बांधकाम व्यावसायिक वामनराव लोखंडे यांची दीड कोटीची फसवणूक : तक्रार दाखल
नाशिकचे बांधकाम व्यावसायिक वामनराव लोखंडे यांनी पण  गुन्हे अन्वेषण विभागात तक्रार केली असून त्यांची विजय जगन्नाथ राठी यांच्या कडून दीड कोटींची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे  या बाबत गुन्हे अन्वेषण विभागा कडून तपास सुरू आहे..

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.