Nashik : फसवणूक प्रकरणी,विजय राठीं विरोधात अजून एक तक्रार दाखल
माजी नगरसेवक वामनराव लोखंडे यांनी दाखल केली तक्रार
नाशिक,दि,६ एप्रिल २०२४-(Nashik Crime News) जागा डेव्हलपमेंट करार करण्याकरिता २८ कोटी रुपये घेत जागा विकसित न करता परस्पर दुसऱ्या व्यावसायिकासोबत करार करून फसवणूक केल्याप्रकरणी राठी आमराई जागामालक विजय जगन्नाथ राठी यांच्यासह कुटुंबातील नऊ जणां विरोधात विजय बेदमुथा (स्पेस सिनर्जी कंपनीचे भागीदार रा.पंडित कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .दि,३ एप्रिल रात्री उशिरा विजय जगन्नाथ राठी यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केल्या नंतर विजय जगन्नाथ राठी यांना ६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात होती.आज राठी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विजय राठी यांना दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान विजय राठी यांच्या विरोधात माजी नगरसेवक तसेच बांधकाम व्यावसायिक वामनराव लोखंडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.विजय जगन्नाथ राठी यांनी वामनराव लोखंडे यांची ५१ लाख रुपयांची फसणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करत आहे.