नाशिकमध्ये वाढलेली गुंडगिरी कमी करा ! विनोद पवारांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण यशस्वी

1

नाशिक | ३ मे २०२५ |  Nashik Crime News नाशिक शहरातील गुन्हेगारीने सामान्य लोकांमध्ये दहशद निर्माण झाली आहे. शहरात सातत्याने खुनाचे सत्र सुरु आहे. नाशिक शहरातील वाढत्या गुंडगिरीविरोधात आवाज उठवत कर्मवीर मा खासदार पद्मश्री दादासाहेब गायकवाड बहुजन रिपब्लिकन असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर दि.२९ एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

विशेषतः उपनगर परिसरात दहशत निर्माण करणारी तडीपार महिला गुन्हेगार भरती साहेबराव अहिरे हिच्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई न करत असल्याने नागरिक त्रस्त होते,अशी माहिती पवार यांनी दिली.

🧾 पोलिसांकडे लेखी पुरावे सादर करूनही दुर्लक्ष (Nashik Crime News)
विनोद पवार यांनी संबंधित महिलेविरोधात ठोस पुरावे पोलीस प्रशासनासमोर सादर करूनही कारवाई न झाल्याने उपोषण सुरूच ठेवले. त्यांची तब्येत खालावत चालली होती, तरीही त्यांनी आंदोलन थांबवले नाही.

🏛️ आयुक्तांनी दिले आश्वासन, आंदोलन तात्पुरते मागे
अखेर आंदोलनाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, सह. पोलीस आयुक्त सचिन बारी आणि पोलीस निरीक्षक गिरी तसेच उनगर मुख्य पीआय जितेंद्र सपकाळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. पवार यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रकरणात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नाशिकचे पोलिस आयुक संदीप कर्णिक यांना संबंधितांवर कारवाई करा असे आदेश दिले.त्यानंतर विनोद पवार यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले.

⚠️ कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा
विनोद पवार यांनी स्पष्ट इशारा दिला की, संबंधित गुन्हेगार महिला विरुद्ध तात्काळ कारवाई झाली नाही, तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.

🤝 सर्वपक्षीय पाठिंबा
या आंदोलनाला नगरसेवक प्रशांत दिवे, शिवसेना झोपडपट्टी अध्यक्ष भिवानंद काळे, तसेच दीपक नन्नावरे, फकीरराव जगताप, आकाश भालेराव, रिपाई नेते देवा ढोके, रामनाथ शिंदे, सुनील पवार, महिला आयोग अध्यक्ष वाल्मिक बुद्ध, बाळासाहेब कारभारी, सानप बाबुराव सांगळे आदींसह अनेक पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.

Nashik Crime News/Nashik Divisional Commissioner’s office demanding action against increasing criminal activities in the city

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] सवयी आणि मैत्रीचा गैरवापर करत, नाशिकमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला […]

Don`t copy text!