नाशिक.दि,२६ मार्च २०२५ – नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच असून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.नाशिकच्या ओझरमध्ये मध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडलीस आली आहे. ,नाशिकमध्ये एक धक्कादायक अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. घरात घुसून नराधमांनी मुलीच्या शरीराचे लचके तोडले. कुणाला सांगू नये म्हणून त्या नराधमांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली ससून . बलात्कार केल्यानंतर पाच संशयित आरोपी फरार झाले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाऊनशिप परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुलगी घरात एकटी असल्याचे पाहिले आणि पाच नराधमांनी डाव साधला.आई मजुरी काम करण्यासाठी गेली होती, त्यामुळे मुली घरात एकटीच होती. हाच डाव साधत पाच जणांनी घरात घुसून कुकर्म केले. नराधमांनी अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले. या प्रसांगाबाबत कुणाला सांगितले तर जिवे मारून टाकू अशी धमकी त्या आरोपींनी मुलीला दिली होती.
ओझर टाऊनशिपमध्ये पाच नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांची तीन ते चार पथके आरोपींचा शोध घेत आहेत.सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारी सत्र सुरु असून या घटना कधी संपणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.