नाशिक, दि. ३० जून २०२५ – Nashik cultural event बाबाज् थिएटर्स तर्फे दर महिन्याच्या १ तारखेला नियमितपणे आयोजिला जाणारा संगीत मैफल व कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा यंदा ५६व्या पुष्पासह सजणार आहे. मंगळवार, १ जुलै रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या संकल्पनेतून संगीतप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुसंस्कृत संगीत अनुभूती आणि कलेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा अनोखा कार्यक्रम दर महिन्याला सादर होतो. या महिन्यात अनघा धोडपकर आणि रसिकसूर यांच्या सादरीकरणातून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या कविता व गीतांचा सुमधुर कार्यक्रम होणार आहे.
संगीत सादरीकरण सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध भिडे, सहगायक रत्नाकर नवघरे आणि स्वानंद पारखी यांच्या आवाजात, अमोल पाळेकर यांच्या वाद्यवृंदाच्या नेतृत्वाखाली होणार आहे. कविता वाचन व निवेदन हे अनघा धोडपकर व डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या खास शैलीत सादर होईल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या तीन मान्यवरांना “कृतज्ञता सन्मान पुरस्कार” प्रदान केला जाणार आहे(Nashik cultural event)
श्री. अतुल भालेराव – चित्रकार व कला शिक्षक
सौ. दिपा बक्षी – सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना
सौ.दुहिता आणि श्री. हर्षद गोळेसर – सुप्रसिद्ध पार्श्वगायक/गायिका
प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. सुहास शुक्ल आणि कलादिग्दर्शक, चित्रकार व मूर्तिकार श्री. शाम लोंढे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जातील.
कार्यक्रम विनामूल्य असून सर्व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रशांत जुन्नरे, प्रीतम पावशे, कैलास पाटील, जे. पी. जाधव, शामराव केदार, डॉ. प्रीतीश कुलकर्णी, दिलीपसिंह पाटील, राजा पाटेकर व योगिता पाटील यांनी केले आहे.