नाशिकमधील पाच धरणांतून विसर्ग सुरू;गंगापूरचा विसर्ग वाढवला,गोदावरीला मोठा पूर..

गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्यांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा

0

नाशिक, दि. २१ जून २०२५ – Nashik Dam Water Release नाशिक जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे गंगापूर धरणासह पाच धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्यांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

गंगापूर धरणातून शुक्रवारी १,००० क्यूसेकने सुरू झालेला विसर्ग शनिवारी रात्री ९ वाजता वाढवून तब्बल ३९४४ क्यूसेकवर नेण्यात आला. गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कादवा, पालखेड धरणांतूनही पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू असून होळकर पुलाखालून ४८८१ क्यूसेकने पाणी वाहत आहे.

📌 गंगापूर धरण विसर्ग स्थिती:(Nashik Dam Water Release)
शुक्रवार सकाळी: ५०० → १,००० क्यूसेक
शनिवार दुपारी १२ वाजता: ११६० → २३२० क्यूसेक
शनिवार रात्री ९ वाजता: ३९४४ क्यूसेक
धरणात सध्या ६५% पाणीसाठा असून पाणलोट क्षेत्रात पावसामुळे आवक वाढत आहे.

📌 इतर धरणांतील विसर्ग:
दारणा धरण: ४,७४२ क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर: ११,०७९ क्यूसेक
कादवा: ७९५ क्यूसेक
पालखेड: १,३५० क्यूसेक
होळकर पूल: ४,८८१ क्यूसेक
या विसर्गामुळे गोदावरी नदीने रौद्र रूप घेतले असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

📌 जायकवाडी धरणात वाढती आवक:
नांदूरमध्यमेश्वरमार्गे पाणी मोठ्या वेगाने जायकवाडीमध्ये प्रवेश करत आहे.
सध्या पाण्याचा वेग: १४,००० क्यूसेक
साठा: ३१.१८% (एक दिवसात १.५% वाढ)

📌 कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीत वाढ
पाणी पातळी: २८ फूट
घाटमाथ्यावर संततधार व राधानगरी धरण विसर्गामुळे वाढती स्थिती
विज बंधारे पाण्याखाली, पर्यायी मार्गाने वाहतूक

📢 प्रशासनाचा इशारा:
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
पाणीपातळी वाढीचा अंदाज लक्षात घेऊन स्थलांतराची तयारी ठेवावी
अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!