Nashik : रामसृष्टीत ७० फुटी प्रभू श्रीराम शिल्पाचा आज लोकार्पण सोहळा 

0

 

Archana Nipankar
अर्चना निपाणकर (अभिनेत्री)
आजचा  रंग – जांभळा 
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email –jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..  फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

नाशिक.दि ११ ऑक्टोबर २०२४ –प्रभू श्रीराम चंद्राच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीस धार्मिकदृष्ट्या महत्व आहे.मोठ्या संख्येने देश विदेशातील भक्त – भाविक व पर्यटक येतात. तपोवनातं  गोदा-कपिला संगम, श्रीराम-सीता मातेची झोपडी, शूर्पनखेचे नाक कापल्याच्या अख्यायिकेचे स्थळ, राम-लक्ष्मण मंदिर अशी कितीतरी शक्तीस्थळे भाविका प्रमाणे पर्यटकांना खेचून आणतात.  राज्य शासनाच्या मदतीने रामसृष्टी उद्यान व तपोवन पर्यटन हब व्हावे यासाठी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी राज्य शासनाच्या पर्यटन  मंत्रालयाकडून माध्यमातून पाच कोटींचा निधी मंजूर करत रामसृष्टीत ७० फुटी प्रभू श्रीराम शिल्प उभारले असून शुक्रवार ता.११ रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे.

दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. दरवर्षी हजारो भाविक रामतीर्थात स्नान, पुजाविधी साठी येतात.शहराच्या सौंदर्यात भर पडावी ,पर्यटनाला गती मिळावी याकरिता नाशिक महापालिकेने जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेतंर्गत तपोवनात पाच एकर जागेत राम सृष्टी उद्यान उभारले. देशभरातूनच नव्हे,जगभरातून येणाऱ्या भक्त भाविकांप्रमाणेच पर्यटक तपोवनात देखील येत असतात.यामुळे पुर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड राहुल ढिकले यांनी तपोवनातील रामसृष्टी मध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचे शिल्प उभारण्याची संकल्पना मांडली. त्यासाठी ११ ऑक्टोंबर २०२२ मध्ये राज्याच्या पर्यटन मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तपोवनातील रामसृष्टी उद्यानात जागा उपलब्ध करण्याच्या सुचना दिल्या.

70 feet Lord Shriram sculpture

जागेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ७१ फुटी शिल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.रामसृष्टी मध्ये प्रभू रामचंद्रांचे शिल्प उभारण्याबरोबरचं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कारंजा व विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुशंगाने पर्यटन विभागाने प्रस्तावाला मंजुरी देताना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. १० फेब्रुवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला होता. शुक्रवार ता.११ रोजी गौरांग प्रभुजी इस्कॉन संस्थेचे वैश्विक सदस्य, यावेळी ,श्री.गुरुजी रुग्णालयचे अध्यक्ष विनायकरावजी गोविलकर,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप महाराष्ट्र भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने आदी उपस्थितीत राहणार आहे .

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!