Nashik : लेखानगर येथील पराक्रमी रणगाड्याचे सोमवारी लोकार्पण

0

नाशिक – पाकिस्तानला धूळ चारणार्‍या, भारतीय भारतीय लष्कराच्या विजयाचे प्रतिक आणि वॉर ट्रॉफी म्हणून नाशिक महापालिकेला मिळालेल्या लेखानगर येथील टी -५५ या रणगाड्याचे लोकार्पण सोमवार दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. कारगिल युद्धात महत्वपूर्ण कामगिरी बजाविणारे भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिली.

भारतीय लष्कराच्या शौर्याची माहिती नागरिकांना व्हावी आणि तरुणांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळावी यासाठी नवीन नाशिकमध्ये युद्धात वापरलेला रणगाडा बसविण्यासाठी शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. लष्कराने पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात वापरलेला पराक्रमी टी-५५ हा रशियन बनावटीचा रणगाडा ‘वॉर ट्रॉफी’ म्हणून नाशिक महानगरपालिकेला पहिल्यांदाच दिला आहे. सन १९७१ च्या युद्धात या टी-५५ रणगाड्यांनी पाकिस्तानचे ५८ रणगाडे उध्वस्त केले होते. यातील एक पराक्रमी रणगाडा जुने सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर चौकात आकर्षक वाहतूक बेट तयार करून ठेवण्यात आला आहे.

Retired Vice Admiral of the Indian Navy Sunil Bhokare
निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे

या रणगाड्याचे आणि लेखानगर येथील वाहतूक बेटाचे लोकार्पण सोमवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. भारतीय नौदलातील सर्वोच्च पदांमधील क्रमांक दोनच्या पदावर सेवा बजावलेले, कारगिल युद्धात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे आणि खांदेशचे भूमिपुत्र निवृत्त व्हाईस अॅडमिरल श्री. सुनील भोकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी, महापालिका आयुक्त कैलास जाधव, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, तोफखाना वित्त विभागाचे भारतीय रक्षा सेवा अधिकारी धनंजय सिंह, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, वसंत गीते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, शिवसेना गटनेते विलास शिंदे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रणगाड्याचे आणि वाहतूक बेटाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी, कारगिल युद्धात नौदलाच्या कामगिरीची माहिती निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे देणार असल्याचे शिवसेना नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!