नाशिक,दि, २० डिसेंबर २०२४ – नाशिक मधून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिक शहराच्या जडणघडणीमध्ये श्री. देवकिसनजी सारडा यांचा मोठा हातभार होता. नाशिक शहरातील औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात सारडा यांचा सिंहाचा वाटा होता. ते ९१ वर्षांचे होते. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.श्री किसनलालजी सारडा यांचे बंधु तथा श्री रामेश्वरजी आणि श्री विक्रमजी सारडा यांचे ते वडील होते.
देवकिसन सारडा त्यांची अंतयात्राआज,शुक्रवार रोजी, सायंकाळी ५.३० वाजता, त्यांचे निवासस्थान, A- 38, नाईस वसाहत, सातपुर येथुन द्वारका अमरधाम येथे निघेल.अंतिम संस्कार संध्या. ६.१५ वाजता विद्युतदाहिनी मध्ये होईल.