नाशिक,दि.९ नोव्हेंबर २०२३ –मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरी ओम सांस्कृतिक संस्था, नासिक व राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकातील कलाकारांनी रंगभूमी दिन वसंत व्याख्यानमाला हाॅल मुंबई नाका नासिक येथे उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून “सन मराठी ” वाहिनीवर सुरु असलेल्या “सावली होईन सुखाची “ह्या मालिकेचे निर्मिती प्रमुख श्री पद्मनाभ राणे सर, अभिनेञी श्वेता मांडे , दिग्दर्शक मुकुंद भुजबळ आणि हरीओम संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ थोरात आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि नटराजांचे पूजनाने करण्यात आले.त्या नंतर सर्व कलाकारांनी ही नटराजांची मनोभावे प्रार्थना केली.
मान्यवरांनी आपले मनोगत मांडताना राणे साहेब म्हणाले आयुष्यातला स्ट्रगल कोणालाच चुकलेला नाही आणि त्यातून मिळालेले यश तुम्हाला मोठा आनंद मिळवून देते तेव्हा तुमच्यातला नम्रपणा मात्र सोडू नका, आयुष्यात न मिळालेल्या कित्येक गोष्टी तुम्हाला विविध भूमिकेतुन मिळतात तुम्ही त्यात रमतात. श्वेता मांडे म्हणाल्या नाटक,सिनेमा,मालिका या सर्वांमध्ये केलेला अभिनयात, रंगभूमीवरचा अभिनय हा जिवंत आणि खरा वाटतो, आणि तिथेच तुम्हाला खरा अभिनय शिकायला मिळतो, भुजबळ म्हणाले मी खरेतर तर मालिका आणि सिनेमात रमणारा माणूस पण नाट्य कलावंत हाच सर्व ठिकाणी टिकू शकतो आणि सर्वांगीण कलाकार बनू शकतो सर्व मान्यवरांनी नाटकाला आणि नाटकातील कलावंतांना अमाप यश मिळू दे अशी नटराजाकडे प्रार्थना केली.
हरी ओम संस्थेच्या अध्यक्षांनीही प्रत्येक कलावंताला भेटून अनेक अनेक शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाटकाचे दिग्दर्शक व कलाकार श्री अविनाश वाघ ,हरीओम संस्थेचे कार्यकर्ते व कलाकार श्री योगेश्वर थोरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, श्री मनोज जानोरकर व शशिकांत अहिरराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले .तसेच यावेळी उपस्थित असलेले नाटकाचे कलावंत श्री विकास पालखेडकर ,श्री भगतसिंग परदेशी , श्री.वैभव वाघ(कास्टींग-डायरेक्टर) , उज्वला पाटील , मीनाक्षी परदेशी , समीक्षा कापडणे, ओम जाधव, अमोल अहिरराव,रोहन वाघ या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.