नाशिक,दि,१४ नोव्हेंबर २०२४ – दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती, मालेगाव आणि नंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले,
पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एयर अंबुलन्स ने दिल्ली येथे ते गेले होते, भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते,मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते, त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे,त्यांचा पार्थिव नाशिकच्या कॉलेजरोड परिसरातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.