नाशिक,दि,४ जानेवारी २०२४ –भारतीय जैन संघटना आणि रसिकलाल धारीवाल हाँस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे २८ वे मोफत प्लस्टिक सर्जरी शिबीराचे ८ ते १० जानेवारी दरम्यान आर टी ओ जवळील रसिकलाल धारीवाल रुग्णालयात आयोजन करण्यात आले आहे. प्लँस्टिक सर्जरीसाठी अमेरिका येथील डाँ. लँरी वेनस्टाईन व त्यांचे सहकारी रहाणार असल्याचे संघटनेचे राज्य सचिव ललीत सुराणा यांनी सांगितले.
मोफत प्लँस्टिक सर्जरी शिबीरात दुंभगलेले ओठ, चेहऱ्यावरील व्रण,डाग, नाकातील बाह्य विकृती याची सर्जरी करण्यात येणार आहे. मात्र ज्या रुग्णांना पांढरे डाग, जळालेले किंवा भाजलेले असतील ते सहभागी होवु शकत नाही.ज्या रुग्णांना शिबीरात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी नाव नोंदणी आणि तपासणी करायची असल्याचे संदिप ललवाणी (9226263888) नितीन नहाटा,(9823287660)रोहित बंब, विक्रम कर्नावट, रोशन टाटिया यांनी सांगितले.