गॅस सिलेंडर बुकिंगनंतर २–३ दिवसांत वितरण;एजन्सींवर गर्दी करू नये :प्रशासनाचे आवाहन

केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू

0

नाशिक | १३ मार्च २०२६- Nashik Gas Cylinder News घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर साधारणतः २ ते ३ दिवसांच्या आत ग्राहकांपर्यंत सिलेंडर पोहोचवण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अलीकडील काही दिवसांत गॅस वितरणाबाबत काही ठिकाणी संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थिती स्पष्ट केली आहे. सध्या गॅस वितरणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू असून कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनी संयम राखून अधिकृत माध्यमांतूनच गॅस सिलेंडर बुकिंग करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

याशिवाय, ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यास गॅस वितरणात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन गॅस वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गॅस वितरणासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी (०२५३) २३१७१५१ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, गॅस सिलेंडर बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल आणि दूरध्वनी सुविधांचा वापर करून घरबसल्या बुकिंग करावे. तसेच गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.प्रशासनाने स्पष्ट केले की, गॅसचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा.

गॅस बुकिंगसाठी उपलब्ध सुविधा(Nashik Gas Cylinder News)

एचपीसीएल (HPCL)
* व्हॉट्सअप बुकिंग – 9222201122
* मिस्ड कॉल बुकिंग – 9493602222
* HP Pay App द्वारे बुकिंग
* कॉल बुकिंग – 8888823456
* ऑनलाईन – www.hindustanpetroleum.com⁠ / myhpgas.in
* इतर माध्यम – GPay, PhonePe, Amazon Pay

आयओसीएल (IOCL)
* व्हॉट्सअप बुकिंग – 7588888824
* मिस्ड कॉल बुकिंग – 8454955555
* SMS/IVR – 7718955555
* ऑनलाईन – cx.indianoil.in
* इतर माध्यम – GPay, PhonePe, Amazon Pay

बीपीसीएल (BPCL)
* व्हॉट्सअप बुकिंग – 1800224344
* मिस्ड कॉल बुकिंग – 7710955555
* IVRS – 7715012345 / 7718012345
* Hello BPCL App
* ऑनलाईन – www.bharatgas.com⁠ / bharatpetroleum.in
* इतर माध्यम – GPay, PhonePe, Amazon Pay

याव्दारे नागरिकांना बुकींग करता येईल असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!