Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू 

0

नाशिक –नाशिक येथील गिरणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा जीवगमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. गिरणारे पंचक्रोशीतील हा पंधरवड्यात दुसरा हल्ला आहे. काही दिवसांपूर्वी गिरणारे येथील मजुराला बिबट्याने जखमी केले होते. ती घटना ताजी असतानाच रात्रीच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे

गायत्री नवनाथ लिलके (रा. कोचरगाव) असे मृत्यु झालेल्या चिमुरडीचे नाव असून  कोचरगाव येथे राहणारी गायत्री काही दिवसांपूर्वी धोंडेगावात तिच्या मामाच्या घरी आली होती. रात्री घराबाहेर खेळत असताना बिबट्या अचानकपणे आला आणि गायत्रीवर झडप टाकून जखमी केले बिबट्याच्या हल्ल्यात  तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने गायत्रीला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत पुन्हा एका बालिकेला आपला जीव गमवावा लागला .

काही दिवसापूर्वी गिरणारे जवळील वडगाव येथेही बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून दिवसाढवळ्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान सदर घटनेनंतर परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या भागातील बिबटे अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करू लागल्याने नागरिकांनी पहाटे व संध्याकाळनंतर घराबाहेर भटकंती करू नये, अथवा उघड्यावर शौचासाठी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.