मुंबई-अहमदाबाद मार्गावरून आता थेट गाठता येणार नाशिक महामार्ग

एमएमआरडीएने घेतला मोठा निर्णय ?

0

मुंबई,५ मार्च २०२३ -मुंबई ते अहमदाबाद या महामार्गावरून ठाणे, भिवंडी आणि कल्याण महामार्गावर आता फक्त वीस ते पंचवीस मिनिटात पोहोचता येणे शक्य होणार आहे. कारण हे दोन्ही महामार्ग कनेक्ट अर्थात संलग्न करण्यासाठी वसई जवळील चिंचोटी या ठिकाणाहून ते भिवंडी जवळील अंजुर फाटा यापर्यंत एक नवीन रस्ता बांधण्याची एमएमआरडीएची योजना असून त्यासंबंधी पुढाकार देखील घेतला आहे.अहमदाबाद वरून पुणे किंवा नाशिक गाठायचे असेल तर ठाण्यातील घोडबंदर रस्त्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या रस्त्यावर कायम ट्रॅफिकची समस्या असते. ही समस्या टाळावी यासाठी नागला बंदर- गायमुख- बाळकुम- खारेगाव ते आनंदनगर टोल नाका म्हणजेच मुलुंड चेक नाका ते ठाणे किनारपट्टी असा हा मार्ग उभारला जाणार आहे.

मुंबईमध्ये अगदी पाच ते दहा किलोमीटरच्या अंतर पार करण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यायला लागते व एक एक तासाचा कालावधी जातो.मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येत असून यामध्ये अनेक महामार्ग उभारण्याची सरकारची योजना आहे.

या दृष्टिकोनातून अशा प्रकल्पांचे महत्त्व खूप मोठे असणार आहे. मुंबईचा विचार केला तर अनेक प्रकारचे मेट्रो प्रकल्प, तसेच समुद्री मार्ग तसेच भुयारी मार्गांच्या माध्यमातून ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठीचा प्रयत्न केला जात आह. या दृष्टिकोनातून मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरून या वाहनांना ठाणे शहर टाळायचे असेल व थेट भिवंडी, कल्याण रोड किंवा नाशिक गाठायचे असेल त्यांच्यासाठी आता एक नवीन मार्गाची उभारणी केली जात असून त्याची नियोजन एमएमआरडीएने केले आहे.

काय आहे एमएमआरडीएचा निर्णय ?
मुंबई ते अहमदाबाद या महामार्गावरून ठाणे, भिवंडी आणि कल्याण महामार्गावर आता फक्त वीस ते पंचवीस मिनिटात पोहोचता येणे शक्य होणार आहे. कारण हे दोन्ही महामार्ग कनेक्ट अर्थात संलग्न करण्यासाठी वसई जवळील चिंचोटी या ठिकाणाहून ते भिवंडी जवळील अंजुर फाटा यापर्यंत एक नवीन रस्ता बांधण्याची एमएमआरडीएची योजना असून त्यासंबंधी पुढाकार देखील घेतला आहे.

यासाठी एमएमआरडीएने सल्लागार निविदा देखील काढले असून २३.५० किमीच्या या प्रत्येकी दोन पदरी मार्ग वसई जवळील चिंचोटी येथून सुरू होईल व ठाणे भिवंडी मार्गावरील अंजुर फाटा येथे संपेल. यासाठी एमएमआरडीएने कॉन्ट्रॅक्टर कडून सल्ला देखील मागवला आहे. त्या अंतर्गत आता या मार्गासाठी आवश्यक असलेले जे काही बारीक तपशील आहे त्याचा अभ्यास करून यासंबंधीचा डीपीआर तयार करायचा आहे.

हा प्रकल्प एकूण २६४ कोटी रुपयांचा असणारा असून निवेदा अर्ज करण्याचे अखेरची तारीख १७ मार्च आहे. तसेच अहमदाबाद महामार्गाला नाशिक महामार्गाची जोडण्यासाठी एमएमआरडीएने मनोर-वाडा ते वाडा-पडघा( आसनगाव ) हा रस्ता तयार करण्याची देखील सुरुवात केली आहे. त्यानंतरचा आता हा दुसरा महामार्ग असणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.