Nashik -कॉलेजरोड वरील श्रध्दा मॉलमध्ये टाटा समूहाच्या ‘स्टार बाझार’चे उद्घाटन
उत्तर महाराष्ट्रातील पहिले दालन : किफायतशीर दरामध्ये खरेदीची ग्राहकांना संधी,ऑनलाइन ऑर्डर सुविधा
नाशिक- ग्राहकांना किरणा, भाजीपाला, फळांसह मांसाहार अत्यंत किफायतशीर दरांमध्ये खरेदीची संधी नाशिककरांना उपलब्ध झालेली आहे. कॉलेजरोडवरील श्रध्दा मॉल येथे टाटा समूहाच्या ‘स्टार बाझार’ ( Star Bazar )दालनाचे उद्घाटन झाले असून, हे नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील पहिले दालन आहे. या दालनात भेट देत ग्राहकांना खरेदी करता येईल. सोबत घरपोहोच सुविधेसाठी संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून मागणी नोंदविता येणार आहे.
स्टार बाझारच्या ( Star Bazar ) उद्घाटन कार्यक्रमाला श्रध्दा मॉलचे संचालक सुरेश आण्णाजी पाटील, सौ. विद्या सुरेश पाटील आर्की. कृणाल पाटील,स्टार बाझार चे ऑपरेशन हेड एम के सुरेश, एरिया मॅनेजर पुणे मिलिंद टोकरे, बिझनेस डेव्हलपमेंट साईनाथ आंगादी ,स्टोअर मॅनेजर भैरवनाथ गिलबिले व कर्मचारी वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ब्रँड म्हणून परीचित असलेले टाटा समूहाचे स्टार बाझार सध्या हैद्राबाद, बंगलोर या मोठ्या शहरासह राज्यातील मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे दालन ग्राहक सेवेसाठी उपलब्ध झालेले आहे.
उत्तर महाराष्ट्र व नाशिकमधील क्षमता ओळखून कंपनीतर्फे नाशिकच्या श्रध्दा मॉलमध्ये दालन ग्राहकांसाठी खुले केले आहे. स्टार बाझारला भेट देत किफायतशीर दरांमध्ये किरणा वस्तू, गृहोपयोगी वस्तू, ताजा भाजीपाला, मांसाहार पदार्थांसह अन्य वस्तूंची खरेदी करता येणार आहे. घर बसल्यादेखील स्टार बाझार इंडिया या संकेतस्थळावर किंवा स्टार क्विक हे मोबाईल ॲपद्वारे आपली मागणी नोंदविता येणार आहे.कॉलेजरोड परीसरात कार्यरत असलेल्या श्रध्दा मॉलमध्ये अनेक नामांकित कंपन्यांची दालन कार्यरत आहेत.या यादीत आणखी एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँडची भर पडली आहे.
आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी कटिबद्ध – सुरेश पाटील
उद्घाटन कार्यक्रमात श्रद्धा मॉलचे संचालक सुरेश आण्णाजी पाटील म्हणाले, नाशिकच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी श्रद्धा मॉलची उभारणी केली आहे. या मॉलच्या माध्यमातून वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ब्रँड नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध आहे. टाटा समूहाचे स्टार बाझार ( Star Bazar ) ग्राहकांसाठी खुले झाले असून, या माध्यमातून नाशिकच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. भविष्यातदेखील सर्वोत्तम ब्रँड नाशिककरांच्या भेटीला आणण्याचा आमचा प्रयत्न राहिल. तसेच श्रध्दा मॉलच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मिती हेच श्रध्दा समूहाचे मुख्य ध्येय आहे.