आयकर विभागाची छापेमारीत नाशिकमधून ८ कोटींची रोकड,सोन्याची बिस्कीटं ,दागिने जप्त

0

नाशिक,दि,५ फेब्रुवारी २०२४ – काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने भल्या पहाटे नाशिकमध्ये दाखल होऊन नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला .(Nashik Income raid) या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे.मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस ८ हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. ८५० कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचचा आयकर विभागाला संशय आहे. या छाप्यात ८ कोटी रुपयांची रोख रक्कम, ३ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने भल्या पहाटे नाशिकमध्ये दाखल होऊन चार जणांच्या दहा ते पंधरा ठिकाणच्या कार्यालयांमध्ये धडक कारवाई केली होती. त्याच आता पुन्हा बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यावधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले.

आता पुन्हा एकदा महसूल आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये धडकल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.बुधवारी सकाळी शहरातील सर्वांत मोठ्या शासकीय कंत्राटदाराची सात निवासस्थाने आणि कार्यालये अशा तब्बल चाळीस ठिकाणी एकाच वेळी धडकले. त्याने त्या ठिकाणाहून ताबाच घेतला. संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.