Nashik:क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पाचे शनिवार लोकार्पण
भारतातील सर्वात मोठे अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा
नाशिक,दि.२७ सप्टेंबर २०२४ – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे.या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ, राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात करण्यात येणार आहे.
स्त्री शिक्षणाचे जनक, समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प बसविण्यात आले आहे. या स्मारकासाठी मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या स्मारकातील भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार देवायानीताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढीकले, आमदार सरोज आहीरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रवीण तिदमे, गजानन शेलार, प्रशांत जाधव, सुदाम कोंबडे, सुधाकर बडगुजर, आकाश छाजेड, डॉ.डी.एल.कराड, प्रकाश लोंढे, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.