Nashik : सातपूरच्या अशोकनगर परिसरात बिबट्या शिरला घरात

व्हिडीओ बघा 

0

नाशिक – गेल्या काही दिवसापासून ठक्कर डोम तसेच सातपूर वसाहतीत सीसी टीव्ही कॅमेरात कैद झालेला  बिबट्या अशोकनगर परिसरातील एका घराच्या माळ्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी अशोकनगर भागात पंढरीनाथ काळे यांच्या घराबाहेरील शौचालयाच्या पोट माळ्यावर बिबट्या बसल्याचे आढळून आले,ही बातमी पसरताच परिसरात बघ्यांची गर्दी होत असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सातपूर अशोकनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळच्या असणाऱ्या वस्तीत सकाळपासून बिबट्या बसलेला असल्याने या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले तीन तास बिबट्या एकाच जागेवर बसून असला तरी दाखल झालेले कर्मचारी त्याला पकडण्यासाठीच्या सर्व उपाययोजना करत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात जाळ्या लावल्या आहेत. तर बिबट्या असलेल्या घराच्या चारही बाजूंनी सापळा रचला आहे.

सकाळी ७ वाजेच्या सुमारास श्री. विकास काळे यांनी नगरसेवक योगेश शेवरे यांना फोन करुन माहिती देताच त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. गेले दोन ते तीन तास बिबट्या एकाच ठिकाणी बसला असून  नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.परिसरात बिबट्या आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे., भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक हादरले आहेत, बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश 

अशोकनगर परिसरातील बिबटयाला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

व्हिडीओ बघा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.