Nashik : लोकहितवादी मंडळाच्या वतीने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

0

नाशिक – लोकहितवादी मंडळ नाशिक व निराधार स्वावलंबन समिती संचलित निस्वास गुरुकूल यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ व ६ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून ३-ब रेषा सेंटर, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड एसटी कॉलनी येथे या स्पर्धा होणार आहेत.

मराठी भाषा दिनानिमित्त लोकहितवादी मंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षापासून दरवर्षी शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या स्पर्धा घेण्याचे मंडळाच्यावतीने निश्चित करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पहिला गट १ ली ते ५ वी मुले, मुली व दुसरा गट ६ वी ते १० वी मुले, मुली अशा चार गटात होणार आहे. या चारही गटासाठी स्वरचित एक कविता व कुसुमाग्रजांची एक कविता अशा दोन कविता स्पर्धकांना सादर करायच्या आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे २ मार्च च्या आत ९८५००१९६०६ या क्रमाकांवर पाठवावीत. प्रत्येक गटासाठी पहिली तीन व उत्तेजनार्थ अशी प्रमुख १२ बक्षिसे व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पहिले पारितोषिक ५००, दुसरे पारितोषिक ३०० व तिसरे पारीतोषिक २०० व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून स्पर्धा सर्वांसाठी विनामुल्य आहे. ज्या शाळेचे जास्त स्पर्धक येतील अशा शाळेला देखील स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाने शाळेतर्फे नावनोंदणी करावी अथवा वैयक्तिक सहभाग घ्यायचा असल्यास मुख्यध्यापकांच्या सहीशिक्यानिशी पत्र घेऊन येणे बंधनकारक आहे.

स्पर्धकास सादरीकरणासाठी छोट्या गटाला ३ ते ५ मिनीटे, मोठ्या गटाला ५ ते ७ मिनीटे कालावधी देण्यात येइल. परिक्षकांचा व संस्थेचा निर्णय अंतीम राहील. या स्पर्धेबाबत अधिक माहिती हवी असल्यास मिलींद कुलकर्णी ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लोकहितवादी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.