Nashik :शनिवारी कालिदास कलामंदिरात रंगणार मल्हार महोत्सव
गायन वादन नर्तनाने नाशिककर रसिकांची संध्याकाळ होणार संस्मरणीय
नाशिक,दि.१३ जुलै २०२३ –नूपुर नाद,पुणे आणि Musomint ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१५ जुलै रोजी सायं ५ वाजता कालिदास रंगमंदिरात मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सादर होणार आहे.
या महोत्सवात गायन वादन नर्तन यांचा समन्वय साधत पावसाच्या आगळ्या रचना सादर होणार आहेत.महोत्सवात श्रीमती रेखा नाडगौडा ह्यांच्या कीर्ती कला मंदिर येथील नर्तिका कथक समूह रचना सादर करतील करणार असून प्रथितयश भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉ स्वाती दैठणकर आणि नूपुर दैठणकर बाग पावस ऋतु हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे त्यांना नीति नायर,पंचम उपाध्याय आणि संजय शाशिधरण हे साथसंगत करणार आहेत.
.
त्या नंतर अथर्व वैरागकर ह्यांचे शास्त्रीय गायन होणार असून कार्यक्रमाची सांगता प्रसिद्ध संतूर वादक डॉ धनंजय दैठणकर आणि त्यांचे पुत्र व शिष्य निनाद दैठणकर ह्यांच्या अभिनव संतूर जुगलबंदी ने होणार असून पावसाची बरसात ते संतूरच्या तरल आणि जोरकस वादनाने परिपूर्ण करणार आहेत.त्यांना अजिंक्य जोशी तबला साथ करणार आहेत. साऊंड्स ऑफ मल्हार अशा प्रकारे गायन वादन नृत्याच्या अनोख्या सादरीकरणाने १५ जुलै ची संध्याकाळ रसिकांसाठी संस्मरणीय होणार आहे.नाशिककर रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.