नवरात्रौत्सवासाठी पंचवटी एक्सप्रेसमध्ये स्वतंत्र रॅक उपलब्ध करून द्यावी -खा.गोडसे
खा.गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी संघटनेची रेल प्रशासनाकडे आग्रही मागणी
नाशिक,दि.११ ऑक्टोबर २०२३ – नवरात्रौत्सव धुमधडाक्यात साजरा व्हावा असे सर्वांनाच वाटत असते.नवरात्रौत्सव आला की समाजामध्ये एक चैतन्याचे वातावरण निर्माण होत असते.यातूनच आज प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मध्यरेल्वे प्रशासनाची यांची भेट घेत नवरात्रौत्सवासाठी पंचवटी एक्सप्रेसमध्ये स्वतंत्र रॅक उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.आपली मागणी योग्य असल्याचे सांगत यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाने गोडसे यांना दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक मुद्द्यांविषयीच्या तक्रारी खासदार गोडसे यांच्याकडे प्रवाशांकडून सतत येत आहेत.अनेक रेल्वेगाडया उशिराने धावत असल्याने होणारी कुंचबना अनेक चाकरनाम्यांकडून खासदार गोडसे यांच्या कानावर येत आहेत.रेल्वे प्रशासनाकडून सोयी सुविधा हव्या तसे उपलब्ध होत असल्याने प्रवाशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नाराजी वातावरण आहे.यातूनच आज खासदार गोडसे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबईत जाऊन वेळ प्रशासनाची भेट घेतली.
पंचवटी एक्सप्रेसमध्ये नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी प्रवासनाने स्वतंत्र्य रॅक उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी यावेळी प्रशासनाकडे केली आहे. याबरोबरच राजधानी एक्सप्रेस वेळेवर धावत नसल्याने खासदार गोडसे यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत राजधानी एक्सप्रेस वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न करावेत, नाशिक -मुंबई दरम्यान रखडलेल्या अंडरपास आणि ओ०हर ब्रिजच्या कामांना गती द्यावी अशा सूचना यावेळी खासदार गोडसे यांनी प्रशासनाने केले आहेत.
पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाडळी येथून पॅसेंजर,मेमू या गाडयामधून प्रवास करतात.शेतीमालाची वाहतूक करतात. परंतु या ठिकाणी तिकीट हाऊस नसल्याने शेतकरी प्रवाशांची मोठी कुचुंबना होत असल्याचे खा.गोडसे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत पाडळी रेल्वे स्थानकावर तातडीने तिकीट हाऊस सुरू करण्याची मागणी केली आहे.यावेळी विभागीय सल्लागार समिती सदस्य किरण बोरसे,प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष कैलास बर्वे,खजिनदार दिपक कोरगावकर,बाळासाहेब केदारे आदी उपस्थित होते.