महापालिकेच्या जागेतील अनधिकृत होर्डिंगवर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 

मक्तेदाराना अभय : पत्रकार परिषदेत नोवा चा आरोप 

0

नाशिक,दि,१७ मे २०२४ – नाशिक मधील काही होर्डिंग्ज धोकादायक बनलेले असतानाही महापालिकेकडून त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे.घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या मालकी असलेल्या जागेत व इतर खासगी जागेतील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट महापालिकेने करावे. ज्या होर्डिंग मालकांनी स्ट्रक्चरल ऑडीट केले नसेल, ज्यांचे होर्डिंग धोकादायक असेल अशा होर्डिंग मालकाविरोधात महापालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील होर्डिंग मालकांच्या नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनतर्फे शहरातील होर्डिंगची परिस्थिती सांगण्यासाठी असोसिएशनतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम बोलत होते. कदम म्हणाले की, महानगरपालिकेने रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेल्या दिशादर्शक कमानी, मनपाने स्वतः उभे केलेले होर्डिंग, मनपाने मनपाच्या मालकीच्या जागेत मक्तेदारी मार्फत उभारलेले होर्डिंग यांचे कोणत्याही प्रकारे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले नाहीत. तसेच अनधिकृत जाहिरात फलक यांच्याकडे मनपाचा कानाडोळा होत आहे. मनपाने यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे नाही तर घाटकोपरसारखी दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही.असोसिएशनच्या अखत्यारित असलेले सर्व ७१६ जाहिरात फलक अधिकृत असून, त्यांचे नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट देखील झालेले,

शहरातील सीबीएसच्या जागेतील होर्डिंग्ज देखील धोकादायक बनलेले आहेत. याशिवाय काही बसथांबेही मोडकळीस आलेले आहेत. असे धोकादायक स्ट्रक्चर्स महापालिकेने काढून घ्यावेत. अनेक दिशादर्शक फलकांचे पत्रे खाली पडलेले आहेत. याबाबत काही विचारले की महापालिकेच्याच एमटीएस व बांधकाम या दोन विभागांत टोलवाटोलवी सुरू आहे. हे स्ट्रक्चर पडले तर जबाबदार कोण, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. यावेळी सचिव गणेश बोडके ,असोसिएशनचे उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार, माजी अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख, सल्लागार  नंदन दीक्षित,सचिन गीते,मनीष नाशिककर हा सह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाचे मुद्दे…
■ घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटनेमागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खासगी होर्डिंगची असणारी परिस्थिती वेगवेगळी
■ शहरातील खासगी जागेतील नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन मेंबर्सचे सर्व जाहिरात फलक अधिकृत
■ नाशिकमधील फलकाची सर्वात मोठी साइज ही ४० बाय ३० असून त्यापेक्षा मोठी नाही
■ सर्व जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट मागील आठ महिन्यांपूर्वीच मनपाने नेमलेल्या एजन्सीमार्फत केले
■ खासगी जागेतील आमच्या असोसिएशन सभासदांचे सर्व जाहिरात फलक हे पत्रा विरहित असून त्यामुळे हवेचा प्रेशर जरी आलाच तरी सदर जाहिरात फलकावरील फ्लेक्स फाटते
■ सदरच्या होर्डिंग स्ट्रक्चरला कोणत्याही प्रकारची हानी नुकसान होत नाही, दुर्घटना होण्याची शक्यता खूप कमी

दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही आमच्या प्रत्येक जाहिरात फलकांची पाहणी करून त्यावर लावण्यात आलेल्या फ्लेक्सला होल करतो. त्यामुळे तेथून हवा पास होण्यास मदत होते. त्यामुळे सदर स्ट्रक्चरला हानी, नुकसान होण्याची शक्यता कमी आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.