नाशिक –नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.सकाळी १० वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यातआली. ही सोडत पद्धती ऑनलाईन पाहण्याची सुविधा असल्याने राजकीय नेत्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आली. त्यात ४४ प्रभागातील १३३ पैकी ६७ जागांवर महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे बड्या -बड्या प्रस्थापित राजकारण्याची दांडी गुल झाली आहे. त्यामुळे १२२ नगरसेवकांपैकी पंधरा ते वीस प्रमुख नगरसेवकांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यंदा १३३ जागा असून ६७ जागा या महिलांसाठी राखीव आहे.त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी १९ जागा राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी १० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी १९ पैकी १० जागा महिलांसाठी राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी १० पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ५२ सर्वसाधारण महिला राखीव आहे.. सुरुवातीला मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आरक्षण सोडत कशी राबविली जाणार याची माहिती दिली. उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी आरक्षण सोडत कशी काढली जाणार याबाबत सविस्तर विवेचन केले.
प्रस्थापितापैकी नेमकी कोणाची झाली कोंडी?
नाशिक महापालिकेसाठीची आरक्षण सोडत महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. ही सोडत फेसबुक लाइव्ह होती. त्यामुळे इच्छुकांची फारशी गर्दी नव्हती. महत्त्वाच्या जागांवर महिला आरक्षण पडल्यामुळे पंचवटी विभागात अरुण पवार, गणेश गीते, उद्धव निमसे, मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, रूची कुंभारकर, सरिता सोनवणे, रवींद्र धिवरे, वर्षा भालेराव, संतोष गायकवाड, सुनीता धनगर, पूनम सोनवणे यांची कोंडी झाली आहे. नाशिक रोड विभागात राहुल दिवे, प्रशांत दिवे, सिडकोमध्ये राकेश दोंदे ,भगवान दोंदे, सातपुरमध्ये शशिकांत जाधव, मनसेचे सलीम शेख यांना समोरासमोर लढावे लागणार आहे.
प्रवर्गनिहाय महिला व सर्वसाधारण आरक्षण
१) प्रभाग क्रमांक १
अ. अनुसूचित जमाती
ब. खुला महिला
क. खुला
२) प्रभाग क्रमांक २
अ. अनुसूचित जमाती(महिला)
ब. खुला महिला
क. खुला
३) प्रभाग क्रमांक ३
अ- अनुसूचित जाती ( खुला)
ब -खुला महिला
क. खुला
४) प्रभाग क्रमांक ४
अ. अनुसूचित जमाती (महिला)
ब. खुला महिला
क. खुला
५) प्रभाग क्रमांक ५
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
६) प्रभाग क्रमांक ६
अ. खुली महिला
ब. खुला
क. खुला
७) प्रभाग क्रमांक ७
अ -अनुसूचित जाती
ब. अनुसूचित जमाती (महिला)
क. खुला
८) प्रभाग क्रमांक ८
अ. महिला
ब. महिला
क. खुला
ड. खुला
९) प्रभाग क्रमांक ९
अ. खुला महिला
ब. खुला
क. खुला
१०)प्रभाग क्रमांक १०
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
११) प्रभाग क्रमांक ११
अ-अनुसूचित जाती
ब- अनुसूचित जमाती(महिला)
क- खुला
१२) प्रभाग क्रमांक १२
अ- अनुसूचित जाती ( महिला
)ब- खुला महिला
क- खुला
१३) प्रभाग क्रमांक १३
अ. खुला महिला
ब. खुला
क. खुला
१४) प्रभाग क्रमांक १४
अ. अनुसूचित जाती( महिला)
ब. खुला महिला
क. खुला
१५) प्रभाग क्रमांक १५
अ. अनुसूचित जाती
ब. खुला महिला
क. खुला
१६) प्रभाग क्रमांक १६
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
१७) प्रभाग क्रमांक १७
अ. खुला महिला
ब.खुला
क. खुला
१८) प्रभाग क्रमांक १८
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
१९) प्रभाग क्रमांक १९
अ. खुला महिला
ब. खुला
क. खुला
२०) प्रभाग क्रमांक २०
अ. अनुसूचित जाती
ब. खुला महिला
क. खुला महिला
२१) प्रभाग क्रमांक २१
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क.खुला
२२) प्रभाग क्रमांक २२
अ. अनुसूचित जाती(महिला)
ब. खुला महिला
क. खूला
क. खूला
२३) प्रभाग क्रमांक २३
अ. अनुसूचित जाती
ब. खुला महिला
क. खुला
२४) प्रभाग क्रमांक २४
अ. अनुसूचित जाती
ब.खुला महिला
क. खुला
२५) प्रभाग क्रमांक २५
अ. अनुसूचित जाती
ब.खुला महिला
क. खुला
२६) प्रभाग क्रमांक २६
अ. अनुसूचित जाती ( महिला)
ब. खुला महिला
क. खुला
२७) प्रभाग क्रमांक २७
अ. अनु जाती (महिला)
ब. अनु जमाती
क. खुला
२८) प्रभाग क्रमांक २८
अ. अनु जमाती
ब.खुला महिला
क. खुला
२९) प्रभाग क्रमांक २९
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
३०) प्रभाग क्रमांक ३०
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
३१) प्रभाग क्रमांक ३१
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
३२)प्रभाग क्रमांक ३२
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
३३) प्रभाग क्रमांक ३३
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
३४)प्रभाग क्रमांक ३४
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. अनुसूचित जमाती(महिला)
क. खुला
३५)प्रभाग क्रमांक ३५
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. खुला महिला
क. खुला
३६)प्रभाग क्रमांक ३६
अ. खुला महिला
ब.खुला महिला
क. खुला
३७)प्रभाग क्रमांक ३७
अ. खुला महिला
ब. खुला महिला
क. खुला
३८)प्रभाग क्रमांक ३८
अ. खुला महिला
ब. खुला
क. खुला
३९)प्रभाग क्रमांक ३९
अ. अनुसूचित जाती (खुला)
ब. खुला महिला
क. खुला
४०) प्रभाग क्रमांक ४०
अ.खुला महिला
ब. खुला
क. खूला
४१)प्रभाग क्रमांक ४१
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. खुला महिला
क. खुला
४२)प्रभाग क्रमांक ४२
अ. अनुसूचित जाती
ब. खुला महिला
क. खुला
४३)प्रभाग क्रमांक ४३
अ. अनु जाती( महिला)
ब. खुला महिला
क. खुला
४४) प्रभाग क्रमांक ४४
अ -अनु जाती. ( महिला)
ब -अनु जमाती
क.खुला