नाशिक दि. १९ मे २०२५-Nashik Museum दिनांक १८ मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयात ठेवलेल्या दुर्मिळ वस्तू, शिल्प व चित्रांच्या प्रदर्शनाची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. या निमित्ताने सावाना (सार्वजनिक वाचनालय) तर्फे आयोजित चर्चासत्रात पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक अमोल गोटे यांनी नाशिकच्या वारसा जपणाऱ्या संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित केले.
या चर्चासत्राचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. चर्चेत राहुल कुलकर्णी, अनंत ठाकूर, अनिता जोशी, रमेश पडवळ, अनंत धामणे, रामनाथ रावळ, चेतन राजापूरकर, महेश शिरसाठ, दिपाली पोळ व सुहास भणगे यांचा सहभाग होता. संग्रहालय (Nashik Museum)अधिक लोकाभिमुख कसे होईल, यावर विचारमंथन करताना विविध सूचना देण्यात आल्या – जसे की संग्रहालय अभ्यासक्रम, प्रसारमाध्यमांचा वापर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमंत्रणे, आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागामार्फत प्रसिद्धी.
श्री. सतीश व सौ. सुजाता करजगीकर यांनी संग्रहालयास सुमारे ३५० वर्षे जुने विष्णू-लक्ष्मी व शंकर यांचे पंचधातू मूर्ती भेट दिल्या.
या अनुषंगाने, १९ मे ते १८ जून २०२५ दरम्यान दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत नाशिककरांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. वस्तुसंग्रहालय प्रमुख अॅड. अभिजित बगदे यांनी नाशिककरांना या ऐतिहासिक ठेव्याला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालभवन प्रमुख सौ. प्रेरणा बेळे यांनी केले. स्वागत प्रास्ताविक अॅड. अभिजित बगदे, पाहुण्यांचा परिचय प्रा. सोमनाथ मुठाळ आणि आभारप्रदर्शन नाट्यगृह सचिव जयेश बर्वे यांनी केले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.
[…] एक कलासंपन्न पर्वणी घेऊन येत आहे – “चित्ररत्न” हे चित्र व हस्तकला प्रदर्शन! […]