Nashik : मायटेक्सपो-2023 प्रदर्शन आजपासून जनतेसाठी खुले
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटक: अन्य चार मंत्र्यांचीही उपस्थिती
नाशिक,दि.६ ऑक्टोबर २०२३ – उद्योग जगतात भरीव कार्य करून भविष्याचा वेध घेणाऱ्या तसेच उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कलाविष्काराला चालना देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरतर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित चार दिवसांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन मायटेक्सपो-2023 आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबरपासून जनतेला बघण्यास खुले होणार आहे.जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट देऊन उद्योजकांचा आनंद द्विगुणित करावा,असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा यांनी केले.
प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार असून पालकमंत्री दादाजी भुसे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार, खा. हेमंत गोडसे, आणि चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण स्टॉल्स ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये आहेत.कृषी, पर्यटन,गृहोपयोगी वस्तू, बांधकाम व्यवसाय आदींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंचे नाविन्यपूर्ण असे तीनशेहून अधिक स्टॉल्स येथे उपलब्ध असणार आहेत.प्रदर्शनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवादही होणार असून सर्वांसाठी एकप्रकारे ती मेजवानीच ठरणार आहे, असेही कांतीलाल चोपडा यांनी पुढे सांगितले.
प्रदर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे,असे चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा,शाखा चेअरमन संजय सोनवणे यांनी सांगितले. प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्र, पुणे, औरंगाबाद,मुंबई, कोल्हापूर,गुजरात, राजस्थान सह अन्य राज्यातील व्यापारी,उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. एबीएच डेव्हलपर, अशोका बिल्डकॉन, किया, होंडा सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट, स्वीड प्रोसेस, एसकेडी ॲडव्हायझर्स प्रा.लि.,सॅन इन्फ्रा इनेंरियस, डेअरी पॉवर, क्रिष्णा पेन्स, इंडीलुब एसपीएल प्रा. लि., धरतीधन ग्रुप ,ओस्तवाल ऑटोमोबाईल, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, महाराष्ट्र औद्योगिक यासह विविध नामांकित व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था,कृषी प्रक्रिया उद्योग यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
प्रदर्शनात व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या नवीन संधी यसह विविध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले असून या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.जागतिक स्तरावर व्यापार उद्योग वृद्धीच्या दृष्टीने इतर देशाचे कौन्सुलेट जनरल व प्रतिनिधीही सहभागी होणार असून व्यापार उद्योग वाढीच्या दृष्टीने महत्वपूर्ण परस्पर सामंजस्य करारही यावेळी होणार आहेत.प्रदर्शनाची घोषणा झाल्यानंतर उद्योजकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अल्पावधीतच सर्व ३०० स्टॉल्सचे बुकिंग झाले,असे शाखा चेअरमन संजय सोनवणे यांनी सांगितले.
मायटेक्स्पो 2023 हे प्रदर्शन व्यापारी,उद्योजक,कृषी प्रक्रिया उद्योजक,विद्यार्थी, उदयोन्मुख व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी एक प्रकारे पर्वणी ठरणार असून त्यांनी प्रदर्शनास आवर्जून उपस्थिती लावावी,असे आवाहन वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा,उपाध्यक्ष नितीन बंग, समन्वयक सचिन शहा, सहसमन्वयक मिलिंद राजपूत, व्हिनस वाणी व कार्यकारिणी सदस्य, मायटेक्सपो-2023 च्या विविध समितीचे चेअरमन, को चेअरमन, समिती सदस्यांनी केले आहे. प्रदर्शनाला चार दिवसात दोन लाखाहून अधिक लोक भेट देतील आणि २०० पेक्षा अधिक कोटींची उलाढाल होईल असा विश्वासही या सर्वांनी व्यक्त