नाशिकच्या हिरवळीत आज रंगणार थरारक दुचाकी रॅली!

एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५ ची दुसरी फेरी आज निसर्गरम्य रस्त्यांवर झळकणार; ७० स्पर्धकांचा सहभाग, ३ महिला रायडर्सचा विशेष आकर्षण

0

नाशिक ,१५ जून २०२५Nashik National Bike Rally नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य रस्त्यांवर आज (रविवार) ‘एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील दुचाकी रॅलीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. इंदोर नंतर नाशिकमध्ये ही दुसरी फेरी होत असून ७० स्पर्धक सहभागी झाले आहेत, यामध्ये ३ महिला रायडर्स सुद्धा विशेष आकर्षण ठरत आहेत.

या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन एमआरएफचे प्रदीप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अमित वाघचौरे, अर्चना वाघचौरे आणि एमआरएफचे श्रीनिवासन उपस्थित होते. AW Events, Godspeed Racing, TVS Apache RTR, गोडा श्रद्धा फाउंडेशन, शिखरे फार्म्स यांच्या सहकार्याने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

📍 रॅलीचा थरारक मार्ग:(Nashik National Bike Rally)
रॅलीचा प्रारंभ आज सकाळी ७:१५ वाजता अंबोली येथील श्रीहरी लॉन्स येथून होणार आहे. यानंतर रॅली वाघेरा घाट – वीरनगर – आडगाव देवळा फाटा – खरवळ – नांदगाव कोळी – हेदुलीपाडा – हरसूल असा अवघड पण रम्य मार्ग तिनदा पार करणार आहे.

प्रेक्षकांना सकाळी ६:१५ पासून स्पर्धा मार्गावर प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सुरक्षा कारणास्तव संपूर्ण मार्ग बंद ठेवण्यात येईल. विदेशी मॉडेलच्या बाईक्स आणि स्कूटर रायडिंगचा थरार थेट प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

Nashik National Bike Rally,A thrilling two-wheeler rally will take place in the greenery of Nashik today!

🩺 वैद्यकीय व सुरक्षा व्यवस्था:
३ विशेष रुग्णवाहिका, एक ट्रॉमा केअर युनिट, तसेच रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. स्पर्धा मार्गावर कोणतीही खासगी वाहतूक, जनावरांची हालचाल पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून शंभरहून अधिक स्वयंसेवक सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात आहेत.

💡 महिलांसाठी स्वतंत्र गट आणि ‘स्टार ऑफ महाराष्ट्र’सारखा वेगळा विभाग देखील रॅलीमध्ये सज्ज झाला आहे.
COC अमित वाघचौरे यांनी सांगितलं की, “मायभूमीत राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी एक फेरी यशस्वी करण्यासाठी आम्ही पूर्णतः सज्ज आहोत.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!