

नाशिक – नाशिकचे नूतन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आज गुरुवार (दि.२१ एप्रिल २०२२) रोजी पदभार स्वीकारला. मावळते पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांची विनंती बदली शासनाने मान्य केल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जयंत नाईकनवरे यांनी गुरुवारी सायंकाळी पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मावळते पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय दुपारीच मुंबईला रवाना झाले आहेत.
जयंत नाईकनवरे हे महाराष्ट्र पोलीस दलात डिवायएसपी म्हणून रुजू झाले.नाशिकला येण्या आधी ते अती महत्वाच्या व्यक्ती सुरक्षा विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून मुंबईत कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्या नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ते आज सायंकाळी आयुक्तालयात दाखल झाले. तर दीपक पांडेय यांची महिला अत्याचार प्रतिबंधात्मक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. दीपक पांडेय यांनी कौटुंबिक कारणास्तव बदली व्हावी म्हणून शासनाकडे विनंती अर्ज केला होता. तो अर्ज मान्य करून त्यांची मुंबईला तर त्यांच्या जागेवर जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
नूतन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचे पोलिस आयुक्त कार्यालयात आगमन होताच पोलिस बँड पथकाने साग्र संगीत स्वागत करून मानवंदना दिली यावेळी पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले श्रींगी यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. मानवंदना स्वीकारल्यानंतर पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी आपल्या दालनात येऊन पदाची सुत्रे स्वीकारली. याप्रसंगी परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. विजय खरात, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था व जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी नूतन पोलिस आयुक्त कशाप्रकारे पोलिसिंग राबवतात, याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागलेले आहे.

