ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे १६ ऑगस्ट पासून नाशिकमध्ये आयोजन
'मिशन इंपॉसिबल' एनसी देशपांडे यांचा विशेष लेख


नाशिक,दि. १५ ऑगस्ट २०२३ –‘जीवाधार सेवक संघ‘ आयोजित ‘अजरामर मी सावरकर मी’,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित विचारवंत आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन उद्या १६ ऑगस्ट पासून नाशिकमध्ये करण्यात आले आहे. कालिदास कला मंदिर येथे, उद्या बुधवार , दिनांक १६ ऑगष्ट २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता आणि सोमवार आणि मंगळवार,१७ आणि १८ ऑगष्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले असून नाशिकरांनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
मिशन इंपॉसिबल
पार्श्वभूमी
सध्या ‘मिशन इंपॉसिबल’ची या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. त्यासाठी ‘टॉम कृझ’ या अभिनेत्याचा वाढदिवस, त्याचं वय, सिनेमातील चित्तथरारक प्रसंग याचं बाजारीकरण म्हणजेच प्रमोशनसाठी सोशल मिडीया जोमाने कामाला लागला होता. परिणामस्वरूप नवीन सिनेमा ‘Dead Reckoning’ रिलीज होताच प्रचंड जल्लोषात स्वागत झालं.
शरद पोंक्षे हा एक आघाडीचा आणि यशस्वी कलाकार ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि ‘हे राम नथुराम’ या दोन नाटकांच्या माध्यमातून ‘नथुराम साकारला’. रसिक प्रेक्षकांनी याला ‘उत्तम अभिनयानुभव, नथुरामला जिवंत केलं’ अशा उपमा आणि विशेषणं लाऊन सन्मान दिला. परंतु या दोन नाटकांच्या अभ्यासातून त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या ‘जाज्वल्य प्रतिमेचं’ मनापासून पूजन केलं आणि एकलव्याप्रमाणे शिष्यत्वही पत्करलं. एक शिष्य आपल्या गुरुंविषयी बोलतांना ‘प्रेम, आपुलकी आणि आदर’ या भावनेनेच बोलतो. एका शिष्याचं ते आत्मसमर्पण होतं आणि आहे.
अभियाच्या क्षेत्रातील शरद हा एकमेव असा यशस्वी एक कलाकार आहे, ज्याने एका भूमिकेच्या माध्यमातून ‘अर्थार्जनाचा मार्ग’ अव्हेरून ‘हिंदू राष्ट्र पुनर्निर्मिती’ हे एक ‘इंपॉसिबल मिशन’ चा विडा उचलला आहे. अर्थात ‘मिशन इंपॉसिबल’ हे माझं मत आहे. शरदशी जेव्हा बोललो तेव्हा तो म्हणाला की ‘हे मिशन अजिबातच इंपॉसिबल नाही. आम्हाला तात्यारावांनी शिकवलंय की या जगात ‘अशक्य असं काहीच नाही’. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही डोंगराला धडका मारतच राहणार. माझं संपूर्ण आयुष्य प्रवाहाच्या विरोधातच पोहण्यात गेलंय. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग, नथुरामची उंचावलेली प्रतिमा, सावरकरांचा जयजयकार, लोकांचा पोटशूळ, नथुराम आणि सावरकरांना झालेला विरोध, पर्यायाने नाटकाला झालेला विरोध आणि नाटकाचे प्रयोग बंद पडणे. मग न्यायालयीन लढा लढण्यात बरीच वर्षे अक्षरशः बरबाद झाली. पुन्हा प्रयोग सुरु झाले. मग निर्मात्यांचा असहकार आणि त्यानिमित्ताने ‘हे राम नथुराम’ या स्वलिखित नाटकाची निर्मिती. नवीन नाटक जोर धरू लागताच शारीरिक व्याधी म्हणजेच कर्करोग. कँसरवर मात करताना स्वत:शी आणि आजाराशी लढावं लागलं. मला जगवलं ते केवळ ‘तात्यारावांचे विचार, जिद्द आणि ध्यास’ या त्रिवेणी शक्तीने. आज हा सावरकरांचा शिष्य, त्यांनी स्वप्निलेल्या भारत एक ‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीच्या विचारांनी आणि कर्तव्याने वचनबद्ध आहे.
मिशन इंपॉसिबल मेक पॉसिबल
गेल्या ७५ वर्षात ‘हिंदू राष्ट्र’ ही संकल्पनाच समाजविचारातून पुसट होत चालल्याची खंत सर्वांनाच आहे. काहीसं अंधुक आणि पुसट होत असलेल्या विचारांना आणि कर्तव्याला जाज्वल्यता आणि प्रखरता आणण्याचं महनीय कार्य शरद पोंक्षे करतोय. आपल्या विचारांना समाजामध्ये रुजवण्याच्या उद्देशाने गावोगावी, शहरोशहरी, देशात आणि परदेशातही शरदच्या व्याख्यानाचं आयोजन करतोय. एकटा शरद केवळ आपल्या शारीरिक कँसरवर मात करू शकतो. सामाजिक विचारांवर झालेल्या कँसरवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे सरसावलं पाहिजे.
हम भी कुछ कम नही ….
आम्हा सर्वांना शरदच्या कार्यकर्तव्याचा सार्थ आभिमान आहे. सर्वानीही ‘सहयोग, सहभाग आणि सहकार्य’ याची जोड देऊन हिन्दुंचं ते ‘हिंदू राष्ट्र’ हे आपलं कर्तव्य मानलंय. शरदच्या या मोहिमेत त्याच्या व्याख्यानाला लाभणारा उस्फुर्त आणि प्रचंड प्रतिसाद, आश्वासक ठरतो. ज्यामुळे शरदला स्वत:ला आणि समाजाला एक नवी पहाट उजाडण्याचा मार्ग स्पष्ट दिसायला लागला आहे.
अर्थात आपण सर्वांनी साथ दिली अथवा नाही, तरीही ….. शरदचं एकला चलो ….. सुरु आहेच आणि राहणारही आहे ……
बिकॉज नो मिशन इज इंपॉसिबल,असं शरद म्हणतोच……
एनसी देशपांडे



Nitin a very good and convincing write from you. All the Best to Shri Sharad Ponkshe